mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

Breaking! मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली, मंगळवेढ्यातून १ लाख बांधव सहभागी होणार; सोलापुरात आज शाळांना सुट्टी जाहीर

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
August 7, 2024
in मंगळवेढा, सोलापूर
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

टीम मंगळवेढा टाइम्स ।

मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीमुळे आज सोलापुरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

मनोज जरांगे पाटील हे आज सोलापुरातील छत्रपती संभाजीराजे चौकपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ‘शांतता रॅली’ काढणार आहेत.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आजपासून जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शांतता रॅली नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे.

या पार्श्वभूमीवर अप्पर जिल्हादंडाधिकारी मनीषा कुंभार यांनी सोलापूर शहरातील सर्व शाळांना सुट्टीचा आदेश जाहीर केला आहे. शाळेला जरी सुट्टी असली तरी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी ड्युटी करणे अनिवार्य असल्याचं आदेशात म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी अंतरवाली सराटीहून तुळजापूरकडे रवाना झाले होते. मनोज जरांगे काल तुळजापूर मुक्काम केल्यानंतर आज सोलापूरात येणार आहेत.

सोलापूर येथे जरांगे पाटील यांच्या उपस्थित महाशांतता रॅलीचे आयोजन करण्यात आलं आहे. जरांगे यांचा आज सोलापूरपासून दौरा सुरू होत आहे. मनोज जरांगे यांनी ज्यांना तारीख दिली आहे, त्या जिल्ह्यातील मराठा समाज रॅलीला ताकदीने येणार आहे.

जरांगे यांचं मराठा समाजाला रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन

“आपल्या मुलांना, शेतकऱ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर ही शेवटची संधी आहे. ज्या ठिकाणी रॅली होणार आहे त्या ठिकाणी काम बंद करून मराठा समाज आज येणार आहे. आपल्या मुलांसाठी समाज एकत्र येणार आहे.

शेवटी आम्हला न्याय पाहिजे. हा संदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. राजकारणी लोक, मोठे करणे हा आमचा पिंड नाही. आमचे लेकरे मोठे करणे हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे”, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे.

“”त्यांना आरक्षण द्यायचे नाही म्हणून आमदार, मंत्री, विरोधक, ओबीसींचे छगन भुजबळ हे सर्व विरोधात उतरले आहेत. पण आपण आपल्या माणसाला उघडे पडू द्यायचे नाही. प्रत्येक जिल्ह्यात मिळेल त्या वाहनाने मराठा समाज रॅलीमध्ये सहभागी होणार आहे. पुढची लढाई ही शेतकरी, मराठा, मुसलमान, धनगर बांधवांची असणार आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

सोलापुरातील जरांगे-पाटील यांच्या शांतता रॅलीत मंगळवेढ्यातून एक लाख बांधव सहभागी होणार

सकल मराठा समाजाच्या वतीने सोलापूर येथे आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीत सहभागी होण्यासाठी आज मंगळवेढा शहर व तालुक्यातून जवळपास 1 लाख सकल मराठा समाज उपस्थित राहणार असून त्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.

मंगळवेढा येथून आज बुधवारी सकाळी ९ वाजता शिवप्रेमी चौकातील शिवालयातून या सभेसाठी वाहने रवाना होणार असून जवळपास १००० चारचाकी व २० हजार दुचाकी वाहनांचा समावेश असणार आहे, सुमारे 1 लाख सकल मराठा समाज सोलापूर येथे जाणार आहे,

शिवालयातून सकाळी सभेसाठी जाणाऱ्या प्रत्येक वाहनाला पाण्याचा बॉक्स, चिवडा-लाडू पाकीट, भगवी उपरणे, टोपी इत्यादी साहित्य सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात येणार आहे.

वाहने सावकाश चालवावी

तसेच सभेला जाताना वाहने सावकाश चालवावी, गडबड गोंधळ करू नये, मोटरसायकलच्या पुंगळ्या काढू नये, इतर समाजाविषयी अथवा जातीय तेढ निर्माण होईल अशा कोणत्याही घोषणा देऊ नये, अशा सूचना सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मनोज जरांगे पाटीलसोलापूर सभा

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

मोठी बातमी! ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळीला अटक; एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध, नेमकं कारण काय?

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026

ई-पीक पाहणीसाठी शेतकऱ्याकडे ५०० रुपयांची खंडणी; साहाय्यकाची हकालपट्टी करत पोलिसांत गुन्हा दाखल; ​दुष्काळी अनुदानाची भीती दाखवून पैशांची मागणी

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
Next Post
पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी मनसे करणार प्रयत्न, धोत्रे यांचे आश्वासन; कोण आहेत दिलीप धोत्रे?

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी मनसे करणार प्रयत्न, धोत्रे यांचे आश्वासन; कोण आहेत दिलीप धोत्रे?

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..