mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोदी 3.0 सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात मोठ्या घोषणांचा पाऊस? शेती, रोजगारावर भर, तर आयकरातून सूट

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 23, 2024
in राष्ट्रीय
मोदी सरकारची दसरा-दिवाळीआधीच भेट! LTC आणि 10 हजार रुपये फेस्टिवल अ‍ॅडव्हान्स

टीम मंगळवेढा टाईम्स ।

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.

सलग सातव्यांदा अर्थमंत्री निर्मला सीतारमन या अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदाचा अर्थसंकल्प 47 लाख 65 हजार 768 कोटींचा असणार आहे. आजच्या अर्थसंकल्पात नेमके काय असणार? कोणत्या भागासाठी काय तरतुदी असतील? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर देशात एनडीए सरकार स्थापन झालं. या सत्तास्थापनेनंतर संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी 22 जुलैपासून सुरु झाले. हे अधिवेशन 22 जुलैपासून 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

या अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले. या अहवालात देशातील कृषी क्षेत्र आणि रोजगार यावर जास्त भर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्याचेच प्रतिबिंब आज सादर होणाऱ्या अर्थ संकल्पावर दिसेल, असे बोललं जात आहे.

त्यासोबतच आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात महिला, तरुण, शेतकरी आणि गरीबांवर लक्ष केंद्रीत केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच आजच्या अर्थसंकल्पातून आयकरदात्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्यासोबतच ५ ते १५ लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना करात सूट मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही अर्थसंकल्पात मोठी तरतूद असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा

त्यासोबतच भांडवली नफा कराबाबत सरकार काही घोषणा करण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय असणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मोदी 3.0 सरकार अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.

लखपती दीदी आणि लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे. देशात तीन कोटी लखपती दीदी करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. सध्या या योजनेअंतर्गत महिलांना प्रतिमहिना 1500 रुपयांची मदत दिली जात आहे.

निर्मला सीतारामन यांचा विक्रम

2019 मध्ये केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमन यांची भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून, सीतारामन यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले आहेत.

यापूर्वी सीतारमण यांनी 2019 आणि 2024 मध्ये दोन अंतरिम बजेट आणि चार पूर्ण बजेट सादर केले आहेत. यात यंदा फेब्रुवारीमध्ये सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचाही समावेश आहे. त्यापूर्वी माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी 6 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे.(स्रोत:TV9 मराठी)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अर्थमंत्री निर्मला सीतारामन

संबंधित बातम्या

मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

बजेट कोलमडणार! पेट्रोल-डिझेलसह गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचे संकेत; नव्या दरांची ‘इतक्या’ दिवसांत होणार घोषणा

May 3, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

कामाची बातमी! मोदी सरकारचा 10 हजार रुपये पेन्शन देण्याचा विचार; ‘या’ लोकांना होणार मोठा फायदा

April 24, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

नागरिकांनो! गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम, हा नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही; वाचा काय गरजेचं?

April 22, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

मोठी बातमी! बारामतीत अपघात, बंगळुरूत तक्रार; अजित पवार अपघात प्रकरणी दाखल झालेली झिरो FIR नेमकी आहे तरी काय?

March 27, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय! आता ‘तारीख पे तारीख’ नाही; कोर्टाच्या तारखांनी हैराण झाला असाल तर ही बातमी वाचाच

March 30, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

प्रेमाचा ‘बुरखा’ फाटला! खरी ओळख लपवून तरुणीला प्रेमजाळ्यात ओढले, जात-धर्म लपवून तरुणीची फसवणूक; संशयास्पद तरुणाला सोलापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

March 15, 2026
Next Post
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

मोठी बातमी! विद्यार्थ्यांना शासनाचा दिलासा; जात वैधता प्रमाणपत्रासाठी मुदत इतकी वाढवली

ताज्या बातम्या

राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढा शहर अतिक्रमणमुक्त करा! संतप्त नागरिकांचे मुख्याधिकाऱ्यांना साकडे; प्रमुख ‘या’ ८ ठिकाणांचा उल्लेख

May 15, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मंगळवेढेकरांच्या तक्रारींचे आता जागच्या जागी निवारण; ‘महसूल समाधान शिबिरा’चे आज आयोजन; प्रलंबित कामांचा निपटारा होणार

May 15, 2026

धक्कादायक! घरगुती वादातून चाकूने हातावर, गळ्यावर सपासप वार; सुनेनं सासूला संपवलं अन्….; नेमकं काय घडलं?

May 14, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

इंधन बचतीसाठी सभापतींचा पुढाकार! दीपाली ताड आता ‘लालपरी’ने करणार प्रवास

May 14, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! भोंदू खरातशी संबंध नाही म्हणणाऱ्या रुपाली चाकणकर ३ दिवस सोबतच गुवाहाटीमध्ये; हॉटेलच्या डिटेल्स समोर

May 14, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

मोठी बातमी! मंगळवेढा बसस्थानक की चोरांचा अड्डा? पोलिसांचा धाक संपला का? भरदिवसा वृद्ध महिलेची सोन्याची बोरमाळ लंपास

May 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा