
टीम मंगळवेढा टाईम्स । सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते ता.माळशिरस येथील एका तरुणाने विवाहीत तरूणीच्या प्रेम प्रकरणातून तिच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली असून सचिन मधुकर पाडळकर वय (38) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नांव असून याबाबत मााळशिरस पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिस सुुुञाकडून मिळालेेेली माहिती अशी आहे की, सचिन पाडळकर हा या पूर्वी अहमदनगर येथे आपल्या कुटुंबा समवेत राहत होता त्याचे वडिल एका कंपनी मध्ये नोकरी करीत होते.त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर सचिन हा त्यांच्या जागेवर नोकरी करू लागला.नोकरी करीत असताना त्याची ओळख त्याच कंपनीत काम करणाऱ्या एका मुलीशी व त्याच्या भावाशी झाली ते सर्वजण मार्केटिंगचे काम करीत होते.
चार ते पाच वर्षानी त्याची ओळख झालेली मुलगी त्यास पैसे मागत होती तू पैसे न दिल्यास बलात्काराची केस दाखल करीन अशी धमकी देत होती.त्याने आडीच लाख रूपये देऊन सुद्धा तिचा पैशाचा तगादा चालू असल्याने सचिन याने झोपीच्या गोळया खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.सचिन याने मार्केटिंगचे काम बंद केल्या नंतर तो आई व बहिणीसह गेल्या चार वर्षापूर्वी नातेपुते येथे राहण्यास आला होता व त्याने साडीचे दुकान टाकले होते.
दि.12 जुलै रोजी सचिन हा जागराणाच्या कामाला जातो असे सांगून घलातून गेला परत तो राञभर घरी आलाच नाही त्याच्या आईने सर्वञ चौकशी केली परंते त्याचा तपास न लागल्याने दि.13 जुलै रोजी नातेपुते पोलिसात मिसींग तक्रार नोंदविली.त्यानंतर त्यांचे शेजारी संतोष भरते यांनी सांगितले की चांदापुरी येथे क्नाॅल मध्ये एक पुरूष जातीचे प्रेत आढळले आहे असे सांगितले वरून आम्ही माळशिरस येथे येऊन पाहीले ते प्रेत सचिनचे असल्याचे दिसून आले.
सचिन याच्या मृत देहा जवळ मोबाईल व काही चिटया साडल्या त्यामध्ये मी प्रियसी व तिचा भाऊ यांच्या त्रासास कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे. दरम्यान सचिन च्या आत्महत्येनं परिसरात खळबळ माजली होती.
solapur news about natepute lover commits suicide due to boredom
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज











