mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

विद्यार्थ्यांनो! विद्यापीठात मिळणार आता वर्षातून दोन वेळा प्रवेश; परदेशी विद्यापीठाच्या धर्तीवर ‘यूजीसी’चा निर्णय

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 18, 2024
in राष्ट्रीय, शैक्षणिक
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

टीम मंगळवेढा टाईम्स। 

परदेशातील विद्यापीठांच्या धर्तीवर भारतातील विद्यापीठे आणि उच्चशिक्षण संस्थांमध्ये आता वर्षातून दोनदा प्रवेश मिळणार आहे. याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) परवानगी दिली आहे.

२०२४-२५ च्या शैक्षणिक सत्रापासून याबाबतची अंमलबजावणी केली जाणार असून, जुलै-ऑगस्ट आणि जानेवारी-फेब्रुवारी अशा दोन वेळा प्रवेश प्रक्रिया राबविल्या जातील, अशी माहिती यूजीसीचे प्रमुख जगदेश कुमार यांनी दिली.

भारतीय विद्यापीठांत वर्षातून दोनदा प्रवेश मिळाल्यास त्याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होईल. बोर्डाच्या परीक्षांच्या निकालांस झालेला उशीर, आरोग्य समस्या किंवा वैयक्तिक कारणांमुळे ज्या विद्यार्थ्यांना जुलै- ऑगस्टच्या सत्रात विद्यापीठात प्रवेश घेता आला नाही, त्यांना जानेवारी- फेब्रुवारीच्या सत्रात प्रवेश घेता येईल.

द्विवार्षिक प्रवेशामुळे महाविद्यालयांना मनुष्यबळ, साधनसामग्रीचे नियोजन करता येईल. विविध विद्याशाखा, प्रयोगशाळा, वर्गखोल्या आणि सहायक सेवा अधिक कार्यक्षमतेने देता येईल. परिणामी, विद्यापीठात चांगले शैक्षणिक वातावरण तयार होईल, असे कुमार म्हणाले.

वर्षभर वाट पाहावी लागणार नाही :

द्विवार्षिक विद्यापीठ प्रवेशामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यास मदत होईल. कारण एकदा प्रवेश चुकल्यास त्यांना प्रवेशासाठी आखणी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागणार नाही, तसेच उद्योगांना त्यांची कॅम्पस भरती वर्षातून दोनदा करता येईल, त्यामुळे पदवीधरांना रोजगाराच्या अधिक संधी मिळतील, असेही कुमार यांनी सांगितले.

द्विवार्षिक प्रवेश बंधनकारक नाही

विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांना द्विवार्षिक प्रवेश देणे बंधनकारक असणार नाही. ज्यांच्याकडे आवश्यक पायाभूत सुविधा आणि अध्यापन वर्ग आहे, ते या संधीचा उपयोग करू शकतात. ज्यांना उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये नवीन अभ्यासक्रम उपलब्ध करायचे आहे, त्यांना ही चांगली संधी आहे, असे कुमार म्हणाले.

आंतरराष्ट्रीय सहकार्यास मदत

जगभरातील विद्यापीठे आधीपासूनच द्विवार्षिक प्रवेश प्रणालीचे पालन करतात. भारतातील संस्थांनी द्विवार्षिक प्रवेश पद्धती स्वीकारल्यास त्या आंतरराष्ट्रीय सहयोग आणि विद्यार्थी देवाणघेवाण वाढवू शकतात. त्यातून जागतिक स्पर्धात्मकता वाढेल व जागतिक शैक्षणिक मानकांशी जुळवून घेता येईल, असेही कुमार म्हणाले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर विद्यापीठ

संबंधित बातम्या

नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो सावधान! ‘अनधिकृत’ इंग्लिश शाळेचा सुळसुळाट; मुलांचे भविष्य अंधारात, स्कूल बसची सुरक्षाही रामभरोसे

July 9, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो नोंद घ्या! ऐन शाळा सुरू होताच शिक्षकांचा ‘एल्गार’; ७ आणि ८ जुलैला शाळा बंद राहण्याची शक्यता; काय आहे कारण?

July 6, 2026
वीरश्री महिला पतसंस्थेचा उद्या मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

महिला सक्षमीकरणासाठी ‘वीरश्री’ पतसंस्थेचे मोठे पाऊल; महिला उद्योजकांना केवळ ‘इतके’ टक्के व्याजदराने कर्ज, विविध ठेव योजनांचाही शुभारंभ

July 1, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

तिकडे NEET चा बाजार, इकडे TET चा तमाशा; गरिबांच्या पोरांनी फक्त फी भरायची का? प्रहारच्या राकेश पाटीलांचा संतप्त सवाल; टीईटी’ परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी

June 28, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

June 21, 2026
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
Next Post
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

चित्रपटानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या नावाने सोलापूर जिल्ह्यात शाळा; कुठे अन् कोणी घेतला निर्णय; नामांतर सोहळ्याचे सर्व मराठा खासदारांची उपस्थिती

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 16, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 16, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 16, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

कर्जमाफीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांची वीजबिलाची पाटी कोरी केली, जुनं वीजबिलही…

July 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा