टीम मंगळवेढा टाईम्स । कोरोना व्हायरस सोबतच मंगळवेढा तालुक्यात सारी ( सिव्हिअरली अॅक्युट रेस्पायरेटरी इलनेस ) या नवीन आजाराचादेखील प्रादुर्भाव झाला आहे. नंदुर गावात एक रुग्ण आढळून आल्याने सारीचा धोका वाढतच चालला असल्याचे दिसत आहे.
नंदूर ता.मंगळवेढा येथील एक पुरुष व्यक्तीचा स्वब चाचणी अहवाल गुरुवार दि.16 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला आहे.सदर व्यक्तीचे मुळ गाव नंदुर ता.मंगळवेढा आहे.पंरतु तो कामानिमीत्त सध्या डोंबीवली,मंबई येथे असतो. सदर व्यक्ती रविवार दि.5 जुलै रोजी मुंबई येथुन नंदूर मध्ये आले होता.
त्यांना छातीत दुखू लागले म्हणून मंगळवार दि.14 जुलै रोजी उपचारासाठी मंगळवेढा येथे नेण्यात आले होते तेथून त्यांना त्याच दिवशी सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर येथे दाखल करण्यात आले होते.त्याचदिवशी म्हणजे दि.14 जुलै रोजी त्यांचा स्वब तपासणी करणेसाठी घेतला होता. त्याचा अहवाल गुरुवार दि.16 जुलै रोजी ते सारीचे रुग्ण म्हणुन आला आहे.
सदर व्यक्ती दि.14 जुलैपासुन आजपर्यत सिव्हील हॉस्पीटल येथे उपचार घेत आहे. त्यांचे निकट संपर्कात ( high risk contacts ) असलेल्या व्यक्तीची संख्या 22 असुन कमी संपर्कात ( low risk contacts ) असलेल्या व्यक्तींची 33 आहे. निकट संपर्कात ( high risk contacts ) असलेल्या व्यक्तींना मंगळवेढा कोवीड केअर सेंटर येथे आणणेची कारवाई सुरु आहे. कमी संपर्कात ( low risk contacts ) असलेल्या व्यक्तींना त्यांचे घरातच विलगीकरण कक्षात रहाणेचे सुचना देणेत आलेल्या आहेत.
सदर ठिकाणी वैदयकीय सर्वेक्षणाचे कामकाज आरोग्य विभागामार्फत सुरु करणेत आलेले आहे. आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज आहे असे आवाहन उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज