टीम मंगळवेढा टाईम्स । इंदापूर शहर व तालुका परिसरात कोरोना रुग्णांच्या संपर्कातील ६१ जणांचे स्वब तपासणीकरिता प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आले होते. त्यापैकी १४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी सांगितली. Pune 14 new corona patients found in Indapur
यामध्ये इंदापूर शहरातील ४ , इंदापूर तालुक्यातील कळंब येथील १ , निमगाव केतकी येथील ३ , वरकुटे येथील ५ , अकोले येथील १ अशा एकूण १४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
इंदापूर शहर व तालुक्यातील एकाच दिवशी १५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते . त्यांच्या संपर्कातील ६१ जणांचे स्वव घेतल्यानंतर हे १४ रुग्ण आता पॉझिटिव्ह आले आहेत. वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर येथील नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज