टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा येथे आज एका पोलीस कर्मचाऱ्यासह तिघांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे. Three people, including a police officer, tested positive again on mangalwedha
मंगळवेढा तालुका वैदयकीय रुग्णालय यांचे मार्फत मंगळवेढा येथे 24 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट आज दि.19 जुलै रोजी घेण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये मंगळवेढा येथील 3 जणांचे रॅपीड अॅन्टीजन टेस्ट पॉझिटिव्ह आलेले आहे.
त्यामध्ये एक पुरुष (पोलीस कर्मचारी रा.खर्डी ता.पंढरपूर,सध्या कार्यरत पोलीस स्टेशन मंगळवेढ) आणि कचरेवाडी ता.मगंळवेढा येथील यापुर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचे निकटतम संपर्कातील 1 पुरुष आणि 1 महीला आहेत.
त्यांचे कोविड केअर सेंटर मंगळवेढा येथे विलगीकरण करणेत येत आहे. उर्वरीत 21 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे . आज प्राप्त अहवालातील पॉझिटिव्ह व्यक्तींचे त्यांचे निकट संपर्कात ( high risk contacts ) आणि कमी संपर्कात ( low risk contacts ) असलेल्या व्यक्तींचे वैदयकीय सर्वेक्षणाचे कामकाज आरोग्य विभागामार्फत सुरु करणेत आलेले आहे.
आवश्यकते नुसार पुढील कार्यवाहीसाठी प्रशासन सज्ज असल्याचे उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज