mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नवा ट्विस्ट! माढा लोकसभेसाठी शरद पवारांना भेटलेला नेता अपक्ष लढणार; धैर्यशील मोहिते पाटलांची डोकेदुखी वाढणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 18, 2024
in राजकारण, सोलापूर
मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपाची मोठी डोकेदुखी वाढणार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

भाजपनं माढा लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून भाजप जिल्हाध्यक्ष असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना पक्षात आणून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

माळशिरसमधील उत्तम जानकर यांनी काल शरद पवार यांची भेट घेतली होती. उद्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे. उत्तम जानकर यांनी काल धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत शरद पवारांची भेट घेतली होती.

उत्तम जानकर धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु असतानाच माढा लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे. डॉ.अनिकेत देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरु केली आहे, अशी माहिती आहे.

अनिकेत देशमुखांकडून तयारी सुरु

माढा लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, महादेव जानकर यांनी महायुतीत राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होण्याच्या अगोदर डॉ.अनिकेत देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. जेव्हा उमेदवार नव्हता तेंव्हा शरद पवार यांनी आमच्या नावावर चर्चा सुरू केली होती.

पण निष्ठावंत उमेदवार असताना भाजप कडून उमेदवार आयात केला आणि आमची फसवणूक केली, असं अनिकेत देशमुख म्हणाले आहेत.

दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख हे माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढण्याची शक्यता आहे. अनिकेत देशमुख यांनी उमेदवारी दाखल करण्याची तयारी सुरू केली असून. मी जिंकण्यासाठी उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात निर्माण झालेला हा तिढा सोडवण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला यश येतं का ते पाहावं लागेल. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील देखील यामध्ये लक्ष घालू प्रश्न सोडवतात का हे येणाऱ्या काही दिवसांमध्येच स्पष्ट होईल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: धैर्यशील मोहिते पाटील

संबंधित बातम्या

मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
सोलापुरात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची माहिती ‘अशी’ भरा ऑनलाइन

बटईने दिली जमीन आणि रातोरात मालकच बदलला! माजी आमदारावर गंभीर आरोप; काय आहे २० एकरांचं गूढ?

October 14, 2026
नागरिकांनो! धैर्यशील मोहिते पाटलांना विजयी करा, माढा, सोलापूर जिल्हा चमकेल; शरद पवारांनी पंढरपुरातील सभा गाजवली

मंगळवेढ्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक; ​खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार रणनीती निश्चित

October 13, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

फक्त भेट द्या आणि जिंका! नवरात्रीनिमित्त ‘विठाई परिवार मल्टीस्टेट’कडून मोफत लकी ड्रॉ कूपन योजना सुरू; प्रत्येक शाखेत नवदुर्गांचा सन्मान व होम मिनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन

October 14, 2026
मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

मंगळवेढ्यात पक्षाची धुरा आता सचिन नागणे यांच्या खांद्यावर; राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) शहराध्यक्षपदी नियुक्ती

October 12, 2026
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

अद्भूत धाडस! विषारी ‘कोब्रा’ चावला, ब्लेडने रक्त काढले अन् सापाला सोबत घेऊन गाठला दवाखाना; मंगळवेढ्याच्या प्राचार्यांचा काळजाचा ठोका चुकवणारा थरार; अखेर मृत्यूवर मात

October 12, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

दुहेरी संकट! दुष्काळात ‘करंट’चा झटका; अंगाची लाही अन् विजेचा खोडसाळपणा; भीषण दुष्काळात सोलापूर जिल्ह्यात भारनियमनाचा घाव

October 11, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासा: पंचनामे पूर्ण; केंद्रीय पथक पाहणीसाठी दाखल; आज मंगळवेढ्यात; मदत कधी आणि किती मिळणार?

October 10, 2026
सोन्याच्या पावलांनी गौराई आली…; गौरी पूजनासाठी लागणारे साहित्य कोणते? ‘अशी’ करा पूजेची मांडणी

नवरात्र नऊ नाही, यंदा तब्बल १० दिवसांचे! सप्तमी तिथी वाढली; असा आहे घटस्थापनेचा मुहूर्त

October 10, 2026
Next Post
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापुरात, भालके कुटुंबियांची घेणार भेट

'दामाजी'च्या निवडणुकीपासून आमच्या गटाला डावलले जात आहे; परिचारक समर्थकांची देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार

ताज्या बातम्या

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

मंगळवेढ्यात शिवसेनेला कसलाही धक्का नाही, कार्यकर्ते नव्या जोमाने मैदानात; युवासेना तालुकाप्रमुख बाळासाहेब निकम यांची माहिती

October 18, 2026
विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

विठाई परिवार मल्टीस्टेटतर्फे मंगळवेढ्यात भव्य दांडिया व ‘नवदुर्गा सन्मान सोहळा’ उद्या संपन्न होणार; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव आणि रोख बक्षीसांची लयलूट

October 17, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात धक्कादायक घटना! ८ दिवसांपासून बेपत्ता वृद्धाचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

October 18, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

दिव्याच्या उजेडात रंगला होता ‘मन्ना’ जुगार; पोलिसांनी छापा टाकून रंगेहात पकडले, मंगळवेढ्यात खळबळ; अवैध धंदेवाईकांचे धाबे दणाणले

October 18, 2026
मंगळवेढा शहराचा कायापालट करणारा व जनतेचे राहणीमान उंचावणारा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा वचननामा जाहीर

मंगळवेढ्यात राजकीय उलथापालथ! प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज मेगा पक्षप्रवेश; तीर्थक्षेत्र आघाडीला जोरदार सुरुंग; तालुक्याची राजकीय समीकरणे बदलणार

October 17, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

संवेदनशील पाऊल! मंगळवेढा सभापती दीपाली ताड थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; मानधनाची रक्कम दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द; ​आमदार आवताडे यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळी उपाययोजनांना वेग

October 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा