टीम मंगळवेढा टाईम्स ।
आम्ही पक्षासोबतच आहोत. मात्र, निधी देताना लक्ष दिले जात नाही. दामाजी कारखान्याच्या निवडणुकीपासून आमच्या गटाला डावलले जात आहे. आताही आम्ही काम केल्यास श्रेय दुसऱ्याला मिळणार, अशी भावना दामाजी कारखान्याचे चेअरमन यांनी व्यक्त केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशांत परिचारक समर्थकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुणे येथे भेट घेतली.
यावेळी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष शिवानंद पाटील, गौरीशंकर बुरुकुल, युन्नुस शेख, काशीनाथ पाटील, भारत पाटील, औदुंबर वाडदेकर आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी फडणवीस यांच्यासमोर तक्रारी मांडल्या. गोपाळ भगरे यांनी मी १९९५ पासून संघाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे, मात्र आम्हाला विश्वासात न घेता आमच्याकडील पद काढून घेतले. सहा महिने पक्षाला पदाधिकारी नव्हते. त्यामुळे बूथ यंत्रणा कशी सक्षम होणार, असा सवाल केला.
औदुंबर वाडेकर म्हणाले, आम्हाला विश्वासात न घेता पदाची निवड केली जात आहे. सध्या लोकसभेच्या उमेदवाराने अद्याप आमच्याकडे विचारणा केली नाही.
उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात निरोपदेखील दिला नाही, अशी तक्रार मांडली. यावेळी फडणवीस यांनी भविष्यात योग्यवेळी प्रशांत परिचारक यांचा योग्य सन्मान करू, अशी ग्वाही दिली.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज