mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामाची बातमी! ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार कॅशलेस उपचार; सोलापूर जिल्ह्यातील पंचवीस हजार जणांना होणार लाभ; नजीकच्या मोठ्या रुग्णालयात शंभर टक्के मिळणार उपचार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 8, 2024
in आरोग्य, सोलापूर
नागरिकांनो लक्ष द्या! मंगळवेढ्यातील सर्व दवाखाने,क्लिनिक आज बंद राहणार

टीम मंगळवेढा टाईम्स। 

इलेक्शन ड्यूटीवर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता कॅशलेस उपचाराची सुविधा मिळणार आहे. ड्यूटी करताना अपघात झाला किंवा हार्ट अटॅक आला किंवा इतर कोणताही आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर कॅशलेस सुविधाअंतर्गत उपचार करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोलापुरातील पंचवीस हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचा याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निहाळे यांनी दिली.

सध्या लोकसभा निवडणुकीची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. उन्हाळा सुरू असल्याने चाळीस ते पंचेचाळीस वयापुढील कर्मचाऱ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओआरएस ज्यूस देण्यात येणार आहे.

यासोबत मतदारांसाठी मतदान केंद्रावर प्राथमिक उपचार पथक तैनात करण्यात येणार आहे, तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघातील १९०० मतदान केंद्रांत तात्पुरत्या पाळणा घरांची सुविधा देण्यात येणार आहे.

मतदान केंद्रांवर मतदान करायला आलेल्या महिलांना त्यांच्याकडील पाच वर्षांखालील मुलांना काही वेळ पाळणा घरात ठेवता येणार आहे. पाळणा घरात लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणी व मनोरंजन साहित्य असणार आहेत.

मतदान केंद्रांवर येणाऱ्या महिलांची अडचण होऊ नये. घरी लहान मुले असल्यावर मतदान करायला महिला बाहेर पडत नाहीत, अशा महिलांसाठी मतदान केंद्रांवर तात्पुरत्या पाळणा घराची सुविधा देण्यात येणार आहे. यात महिला कर्मचारी पाळणा घरात येणाऱ्या मुलांची काळजी घेणार आहेत. सांभाळ करणार आहेत.

तसेच उन्हाळा असल्याने लांबून येणाऱ्या मतदारांची काळजी घेण्यासाठी मतदान केंद्राजवळ आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे संपर्क नंबर मतदान केंद्रात लावले जाणार आहे.(स्रोत:लोकमत)

मतदारांना मिळणार ज्यूस

■ जिल्ह्यात एकूण ३५ लाख ७८ हजार ९७२ मतदार असून, यात १८ लाख ५३ हजार ५९४ हे पुरुष मतदार आहेत. १७ लाख २५ हजार महिला मतदारांची संख्या असून, २७८ तृतीयपंथी मतदार आहेत.

शहरी भागात १,२४४ मतदान केंद्रे असून, ग्रामीण भागात २,३५५ मतदान केंद्रे आहेत. मार्चनंतर कडक ऊन असणार असल्याने मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना ओआरएस ज्यूस मिळणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर जिल्हा

संबंधित बातम्या

धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
Next Post
मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील 'त्या' मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख तर गंभीर जखमीस 1 लाखांची शासकीय मदत जाहीर; आमदार आवताडे यांची माहिती

ताज्या बातम्या

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

​दु:खद प्रसंगी माणुसकीचे दर्शन! धनश्री व सीताराम परिवारातर्फे मंगळवेढा तालुक्यातील अपघातग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात

April 17, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

संतापजनक! किरकिर करते म्हणून नातीने ८२ वर्षांच्या आजीला दगडावर आपटून मारले; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 17, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 17, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 17, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा