mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पदरी निराशा! कांद्याची आवक घटल्यानंतरही भाव गडगडलेलेच; भाव ‘इतक्या’ रुपयांवर स्थिर; निर्यातबंदीमुळे शेतकरी अडचणीत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 3, 2024
in सोलापूर
शेतकऱ्यांनो! पेरणी संदर्भात कृषी अधिकारी यांनी केले महत्त्वपूर्ण आवाहन; यंदाच्या खरीप हंगामात योग्य नियोजन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ दिवसांत सव्वाबारा लाख क्विंटल कांदा आला, पण सरासरी भाव अकराशे रुपयांवरच स्थिरावल्याचे चित्र आहे. निर्यातबंदीनंतर भावात झालेली घट दिवसेंदिवस कमीच होत असून आवक वाढल्यानंतर शेतकऱ्यांना सातशे ते आठशे रूपये क्विंटल दराने कांदा विकावा लागत आहे.

केंद्र सरकारने निर्यातबंदी करण्यापूर्वी कांद्याचे दर प्रतिक्विंटल साडेचार हजार रूपयांपर्यंत होते. मात्र, देशाअंतर्गत बाजारपेठांमध्ये कांदा कमी पडेल, भाव वाढतील म्हणून निर्यातबंदीचा निर्णय झाला. मात्र, या निर्णयानंतर शेतकऱ्यांच्या आशा-अपेक्षांचा चुराडा झाला.

खर्चही निघेना असा दर कांद्याला मिळत आहे. १ जानेवारी ते १ फेब्रुवारी या काळात सुट्ट्या वगळून १८ दिवस कांद्याचे लिलाव झाले. त्यात जवळपास १२ लाख ४० हजार क्विंटल कांदा सोलापूर बाजार समितीत विकला गेला.

कोट्यवधींची उलाढाल झाली, बाजार समिती मालामाल झाली, पण शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळाला नाही. मागील आठवड्यात तब्बल दीड लाख क्विंटल कांदा एकाच दिवशी बाजारात आला आणि शेतकऱ्यांना सात-आठ रूपये दराने तो विकावा लागला.

वास्तविक पाहता कांदा लागवड ते काढून बाजारात आणेपर्यंत प्रतिकिलो किमान १० ते १२ रूपयांपर्यंत खर्च होतो. कांद्याला सुरवातीला चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता.

सावकाराच्या कर्जाचा डोंगर कमी होईल, मुलाचे शिक्षण, मुलीच्या विवाहाची चिंता मिटेल असे त्याचे स्वप्न होते. पण, केंद्र सरकारच्या एका निर्णयाने त्या स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला. दुसरीकडे ना दुष्काळ ना अवकाळीची मदत अशी अवस्था आहे.

महिन्यातील कांदा आवक

लिलावाचे दिवस १८, एकूण आवक १२,३९,५२९ क्विंटल, सरासरी भाव ७०० ते १४००

बंगळुरू बाजारातही निराशाच

सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने दर कमी झाला म्हणून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी कांदा बंगळुरूच्या बाजारात नेला. त्याठिकाणी सोलापूरच्या तुलनेत थोडा जास्त दर मिळाला, पण खर्चही त्या प्रमाणात झाला. त्याठिकाणी देखील शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली.

‘जगावे की मरावे’ अशी चिंताजनक स्थिती बळिराजासमोर असतानाही राज्य सरकारकडून कांदा अनुदानाची घोषणा नाही ना अवकाळी, दुष्काळी भरपाई नाही हे विशेष. गुरूवारी सोलापूर बाजार समितीत ४९३ गाड्या कांद्याची आवक होती. शेतकऱ्यांना सरासरी ११०० रूपयांप्रमाणेच दर मिळाला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: शेतकरी कांदा

संबंधित बातम्या

खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

​ग्रामीण तरुणाईला गावातच रोजगाराची सुवर्णसंधी; ‘कृषि उद्योजक निवड अभियानाला प्रारंभ; ‘माणगंगा परिवार’ आणि ‘ई-ॲग्री दुकान’चा ग्रामीण युवकांसाठी मोठा पुढाकार

August 8, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 8, 2026
ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

ग्रामीण भागातून रक्त संकलन करणे ही काळाची गरज – तृप्तीताई राजू खरे; राजेंद्र फुगारे यांच्या वाढदिवशी भव्य रक्तदान शिबिर

August 6, 2026
आधारकार्ड घरी मागवून घेण्यासाठी फक्त 50 रुपये शुल्क भरावे लागणार

मतदारांना मोठी दिलासादायक बातमी! ‘एसआयआर’ अभियानासाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ; सुधारित वेळापत्रक जाहीर

August 6, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठा आरक्षणाची धग वाढणार! सोलापूर जिल्ह्यात मनोज जरांगे-पाटील यांच्या चार तोफधडक सभा

August 8, 2026
वाळू आता ऑनलाईन मिळणार; ‘ना नफा, ना तोटा’ वर विक्री, नव्या धोरणाला मान्यता; यांच्या अध्यक्षतेखालील तांत्रिक समिती नेमली जाणार

नियम धाब्यावर बसवून वाळू उपसा भोवला! भीमा नदीतील वाळू ठेका रद्द; १ कोटी २० लाखांची ठेव जप्त, गुन्हे दाखल करण्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा झटका

August 5, 2026

कुत्रा पाळताय? मग खबरदार! श्वानाने बालिकेला चावल्यानंतर सोलापुरात मालकावर गुन्हा; ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शक्यता

August 4, 2026
Next Post
‘संकल्प’ पतसंस्थेतील अपहाराची व्याप्ती वाढण्याची चिन्हे; प्रथमेश कट्टे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी, अविनाश ठोंबरेला पोलीस कोठडी; परदेशी बँकांकडून कोट्यवधी रूपये मिळविण्याचा प्रयत्न

अतिरेक! दामदुप्पटच्या आमिषाने शिक्षक पत्नीसह पतीस गंडा; १० महिन्यांत रक्कम दामदुप्पट करून मिळेल असे दाखवले आमिष

ताज्या बातम्या

खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

​ग्रामीण तरुणाईला गावातच रोजगाराची सुवर्णसंधी; ‘कृषि उद्योजक निवड अभियानाला प्रारंभ; ‘माणगंगा परिवार’ आणि ‘ई-ॲग्री दुकान’चा ग्रामीण युवकांसाठी मोठा पुढाकार

August 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 8, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा