टीम मंगळवेढा टाईम्स ।
एका शिक्षक पत्नीसह पतीची शेअर मार्केटमध्ये दामदुप्पट पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी चौघांविरुद्ध आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
एकाला अटक केली आहे. गुन्हा दाखल झालेल्या मधील संशयित संतोष अडसूळ यांच्यावर यापूर्वीही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
फिर्यादी कविता संजय चव्हाण (वय ४१, रा. यपावाडी, ता. आटपाडी) यांचे पती संजय चव्हाण यांच्याशी संशयित आरोपी गजानन आप्पासाहेब गायकवाड (रा. शेटफळे) याची ओळख होती.
गायकवाड याने चव्हाण दाम्पत्यास निहारिका फायनान्सियल सर्व्हिसेस प्रा. लि. या शेअर मार्केट कंपनीबद्दल माहिती दिली. कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास १० महिन्यांत रक्कम दामदुप्पट करून मिळेल असे आमिष दाखवले.
चव्हाण दाम्पत्याने गायकवाड यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर वेळोवेळी २१ लाख रुपये पाठविले होते.
परतावा म्हणून संशयित आरोपी दीपाली गजानन गायकवाड हिने गुगल-पे वरून चव्हाण यांना ८० हजार रुपये पाठवले.
दुसरा संशयित ऋतिक दिलीप शिंदे याने ३५ हजार रुपये रोकड स्वरूपात चव्हाण यांच्या पतीस दिली होती. त्यानंतर उर्वरित रक्कम न देता फसवणूक केली. त्यामुळे शिक्षिका चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज