mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

अमरावतीमधील ‘त्या’ हॉस्पिटलची संतप्त जमावाकडून तोडफोड

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
अमरावतीमधील ‘त्या’ हॉस्पिटलची संतप्त जमावाकडून तोडफोड

टीम मंगळवेढा टाईम्स । अमरावती शहरालगतच्या मोदी हॉस्पीटलमधील स्वॅब सेंटरमध्ये कोरोना चाचणीच्या नावाखाली टेक्निशिअनने युवतीचा गुप्तांगाचा स्वॅब घेतला. हा चिड आणणारा प्रकार काल घडला. युवतीने आपल्या भावाला सांगितल्यानंतर ‘त्या’ टेक्नीशिअनची पोलीसांत तक्रार करण्यात आली. या घृणास्पद प्रकाराचे संतप्त पडसाद उमटले असून शिवसेना व एआयएमआयएमच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी हॉस्पिटलच्या स्वॅब सेंटरमध्ये तोडफोड केली. Amravati Swab taken from girl’s genitals, angry mob vandalizes Modi hospital

अचानक घडलेल्या या घटनेने स्वॅब सेंटरसह इतर कक्षांत उपस्थित डॉक्‍टर, परिचारिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खुर्च्या उचलून काचांवर फेकल्याने काही ठिकाणी काचा फुटल्या, असे पोलिस निरीक्षक पंजाब वंजारी यांनी सांगितले.

शहरातील एका मॉलमध्ये कार्यरत कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने त्याठिकाणी कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात येत होते. त्यासाठी संबंधित युवतीसुद्धा मोदी रुग्णालयात गेली होती. मात्र, तेथील लॅब टेक्‍निशियनने युवतीच्या गुप्तांगाचे स्वॅब घेतल्याने युवतीला संशय आला व तिने या घटनेची तक्रार बडनेरा पोलिस ठाण्यात केली. त्यावरून पोलिसांनी संबंधित लॅब टेक्‍निशियन विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

अशा पद्धतीने कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यावर तातडीने गंभीर स्वरूपाची कारवाई करण्याची मागणी जिल्ह्यात जोर धरत आहे. त्याचे संतप्त पडसाद आज उमटले. काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोदी रुग्णालय गाठून त्याठिकाणी तोडफोड करीत संबंधित गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. घटनास्थळी बडनेऱ्यासह मुख्यालयाचे पथक तैनात करण्यात आले होते. 

काही कक्षांतील खुर्च्या दारावरही भिरकावल्याचे दिसून आले. सायंकाळपर्यंत याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाच्यावतीने तक्रार दाखल झाली नव्हती. त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही, असे पोलिस निरीक्षक वंजारी यांनी स्पष्ट केले. रुग्णालयात शिवसेनेसह एआयएमआयएमचे सुमारे शंभर पदाधिकारी जमून त्यांनी घृणास्पद कृत्य करणाऱ्या लॅब कर्मचाऱ्याविरुद्ध घोषणाबाजी केल्याने वातावरण तापले होते.

महिला अधिकाऱ्यांसोबत चाचणीसाठी युवती लॅबमध्ये गेली. यावेळी युवतीसह इतराचे स्वॅब घेण्यात आले. त्यानंतर स्वॅब घेणारा लॅब टेक्‍निशियन अलकेश अशोक देशमुख (वय 25, रा. पुसदा) याने संबंधित युवतीस “तुमची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे’ असे सांगितले. शिवाय दुसरी युरिनल चाचणी करावी लागेल, असे सांगून तिला थांबवून ठेवले. युवतीला अलकेशच्या वर्तणुकीवर शंका आली. तिने आपल्या भावाला घटनाक्रम सांगितला. 

युवतीच्या भावाने जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन स्वॅब टेस्ट नंतर कोरोना चाचणीसाठी युवतीला दिलेल्या टेस्टबाबत चौकशी केली असता स्वॅब व्यतिरिक्त दुसरी कोणतीही चाचणी त्यासाठी करावी लागत नाही, असे डॉक्‍टरांनी सांगितले. चाचणी घेणाऱ्या अलकेशने युवतीचा मोबाईल क्रमांक घेतला अन्‌ तिला थोड्या वेळाने “तू खूप सुंदर दिसते, माझ्याशी मैत्री करशील काय?’ असा मेसेजही पाठविला. युवतीच्या लॅबटेक्‍निशियनचा उद्देश लक्षात आला. तिने बडनेरा ठाण्यात तक्रार नोंदविली

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Maharashtra Maza

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुणे दौरा अन लोकप्रतिनिधींचा तक्रारींचा पाऊस!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुणे दौरा अन लोकप्रतिनिधींचा तक्रारींचा पाऊस!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

June 23, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रारूप आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची उडाली धावपळ; हरकती नोंदवण्यासाठी अवघे ‘इतके’ दिवस शिल्लक

June 23, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! राजकारण की समाजकारण? मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान; नेमका प्लॅन काय?

June 22, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सावधान! मंगळवेढा बस स्टँडवर चोरटे सक्रिय; वृद्धेचे दागिने आणि रोकड लंपास, गुन्हा दाखल; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

June 22, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

June 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा