टीम मंगळवेढा टाईम्स । संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने मोठया प्रमाणात जिवीतहानी होत आहे. त्यामुळे आपल्या सरकारनेे या विषाणूचा प्रसार होऊ नये या कारणास्तव संपूर्ण राज्यात 3 महिने लॉकडाऊन लागू करण्यात आली होती. सोलापूर शहरात मोठया प्रमाणावर विडी कामगार, यंत्रमाग कामगार, बांधकाम कामगार व इतर कामगार असून त्यांचा उदरनिर्वाह रोजंदारीवर आहे. 50 per cent discount should be given in Solapur household electricity bill – b. Praniti Shinde
परंतू गेली 3 महिने लॉकडाऊनमुळे त्यांची रोजंदारी बंद असल्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. अशा परिस्थितीमध्ये विज वितरण कंपनीकडून 4 महिन्याचे सरासरी बिल वाढीव दराने आलेले आहे. परंतू सध्या आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांना विज बिल भरणे अशक्य आहे.
याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर व जिल्ह्यातील नागरीकांना सध्या आलेले 4 महिन्याचे विज बिल भरणे अशक्य असल्यामुळे त्यांच्या विजेच्या बिलामध्ये 50 टक्के सवलत देण्यात यावे याबाबत मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्याकडे मागणी केली.
He demanded 50 per cent concession in electricity bill from the Chief Minister and Energy Minister.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज