टीम मंगळवेढा टाईम्स ।
सर्व प्रवर्गाच्या दिव्यांग लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती व आवश्यकतेनुसार लाभ एकाच ठिकाणी मिळावा, यासाठी राज्य शासनाने ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी हे अभियान संपूर्ण राज्यात सुरू केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी या अभियानाचा कार्यक्रम आज बुधवार २० सप्टेंबर रोजी सोलापूर कुमठे रोड येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनमध्ये सकाळी दहा वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या अभियानाचे उद्घाटन ना.बच्चू कडू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांनी दिली.
या कार्यक्रमास पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, खा. ओमराजे निंबाळकर, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. अरुण लाड, आ. जयंत आसगावकर, आ. सुभाष देशमुख,
आ. बबनराव शिंदे, आ. विजयकुमार देशमुख, आ. प्रणिती शिंदे, आ. शहाजी पाटील, आ. राजेंद्र राऊत, आ. संजयमामा शिंदे, आ. यशवंत माने, आ. समाधान आवताडे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. राम सातपुते, राज्याचे दिव्यांग कल्याण सचिव अभय महाजन, दिव्यांग कल्याण आयुक्त विष्णुदास घोडके, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
शासनाच्या विविध योजना राबवित असताना दिव्यांग लाभाथ्याची होत असलेली गैरसोय लक्षात घेऊन राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाने राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी हे अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. या अभियान कार्यक्रमात दिव्यांग कल्याण आयुक्तालय, जिल्हाधिकारी कार्यालय, दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास आले आहेत.
महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय व वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,
महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, छत्रपती शाहु महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, महिला आर्थिक विकास महामंडळ, भारतीय कृत्रिम अवयव व अंग निर्माण केंद्र, कानपूर, जिल्हा उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय,
राज्य परिवहन महामंडळ, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लीड बँक, कृषी विभाग, आरोग्य विभाग, नगर परिषद प्रशासन विभाग, पंचायत समिती, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण आदी विभागाचे स्टॉल्स या अभियान कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात
दिव्यांग लाभार्थ्यांची प्रवासाची मोफत व्यवस्था
जिल्ह्यातून येणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांना सोलापूर येथे शिबिरीसाठी नेण्या-आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यासंदर्भात संबंधित ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगर परिषदा यांना सांगण्यात आले असून, थेट या शिबिरासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांना नेण्या-आणण्यासाठी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वतीने एस. टी. स्टॅन्ड, भैय्या चौक,
रेल्वे स्टेशन, सात रस्ता, तुळजापूर नाका येथे वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व प्रवर्गाच्या दिव्यांग लाभार्थ्यांनी या अभियान कार्यक्रमासाठी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद,
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, महानगर पालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर, दिव्यांग कल्याण विभागाचे सच्चिदानंद बांगर यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज