टीम मंगळवेढा टाईम्स ।
कामगार कल्याण विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या महिला नाट्य महोत्सवात स्पर्धेत मंगळवेढा केंद्राने सादर केलेल्या दवंडी एकांकिकेस प्रथम क्रमांक मिळाला.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कोठारी अॅग्रोटेक प्रा.लि. चे अक्षय कोठारी, उपप्राचार्य इंग्लिश स्कूल तेजस्विनी कदम यांच्या हस्ते व कामगार कल्याण अधिकारी समाधान भोसले यांच्या उपस्थितीत पार पडला.
स्पर्धेत दवंडी, कावळा शिवला, देखणा दिवा, नारी शक्तीचा जागर, मंगळागौर यांनी यश संपादन केले. तर अभिनयात रेश्मा गुंगे, श्रेया माशाळ, रूपाली शहा यांनी क्रमांक पटकवला,
तर दिग्दर्शनमध्ये उज्ज्वला भोसले, विजया कदम, श्रेया माशाळ यांनी परितोषिक पटकावले. नाट्य स्पर्धेचे परीक्षक म्हणून रणजित गायकवाड, समद फुलमामडी व अपर्णा जोशी यांनी काम पाहिले. स्पर्धेत एकूण ११ संघांनी सहभाग घेतला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज