मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
इयत्ता १०वी व १२वी बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम, द्वितीय, आणि तृतीय क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन करणाऱ्या येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कै महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने
आज रविवार, दिनांक १६ जुलै २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता जोगेश्वरी मंगल कार्यालय, बायपास रोड मंगळवेढा येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे.
सदर कार्यक्रमाप्रसंगी गुणवंतांचा सत्कार पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते व अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब समिंदर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कु. नयोमी साटम, तहसीलदार मदन जाधव, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती तृप्ती अंधारे, प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय जावीर,
नगरपरिषद मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, गटशिक्षणाधिकारी पोपटराव लवटे आदी मान्यवर मंडळींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व गुणवंत, मार्गदर्शक शिक्षक, पालक इतर नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कै महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या यांच्यावतीने करण्यात आले आहे.
आ आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये आज टिफिन बैठकीचे आयोजन
केंद्र व राज्य सरकारचा महत्वकांक्षी असणाऱ्या टिफिन बैठकीचे पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीमध्ये रविवार, दिनांक १६ जुलै २०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता श्री बाबा आर्वीकर महाराज मठ माचणूर येथे आयोजन करण्यात आले आहे.
शासनदरबारी असणाऱ्या विविध योजना व मतदारसंघातील विकासात्मक सोयी-सुविधा यावर सखोलपणे आणि विस्तृतपणे चर्चा घडवून आणण्यासाठी सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीसाठी जास्तीत- जास्त नागरिकांनी उपस्थिती राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज