मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मुदत संपत आलेल्या सोलापूर जिल्ह्यातील १०९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकींच्या आरक्षणाची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. आता मतदार याद्यांचा कार्यक्रम येणार असून तो झाल्यानंतर, डिसेंबर २०२३ पर्यंत निवडणुका होऊन नवीन ग्रामपंचायती अस्तित्वात येणार आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील १०९ ग्रामपंचायतीची मुदत डिसेंबर केलेल्या २०२३ अखेर संपते. दरम्यान, नव्याने निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगाकडून तयारी सुरू झाली आहे.
१६ जून २०२३ रोजी निवडणुकीसाठी आरक्षणाची सोडत काढण्याकरिता विशेष ग्रामसभा घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. २३ जून रोजी विशेष ग्रामसभा बोलावून तहसीलदारांनी प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली
अनुसूचित जाती राज्य महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासप्रवर्ग, नागरिकांचा मागासप्रवर्ग व सर्वसाधारण महिला या आरक्षणाची सोडत काढण्यात आली.
२३ जून रोजी प्रभागनिहाय आरक्षण प्रारूप अधिसूचनेला (नमुना १) जिल्हाधिकाऱ्यांना मान्यता दिली. (स्रोत:लोकमत)
आरक्षण सोडत जाहीर झालेले तालुके
करमाळा- १६, माढा- १४, बार्शी- ०५, माहोळ- ०२. पंढरपूर- ०३, सांगोला- ०४, माळशिरस- १०, मंगळवेढा- २७, दक्षिण सोलापूर- १०, अक्कलकोट-‘ १८ अशा एकूण १०९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज