मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरमधील नेते भगीरथ भालके भारत राष्ट्र समिती (बीआरएस) च्या वाटेवर आहेत. त्यांच्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी खास विमान पाठवले.
भालके ‘बीआरएस’मध्ये गेले तर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जास्त बोलणे टाळले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांना भारत राष्ट्र समितीचे प्रमुख तथा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कार्यालयातून पक्षप्रवेशासाठी संपर्क साधण्यात आला. मात्र, भालके यांनी आजपर्यंत ‘वेट ॲंड वॉच’ची भूमिका घेतली होती.
दरम्यान, बुधवारी भगीरथ भालके चार्टर्ड विमानाने हैदराबादला रवाना झाले आहेत. त्यांनी भेट घेतली, ते २०२४ मध्ये भारत राष्ट्र समितीकडून विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. राव यांच्यासोबतच्या या भेटीत काय काय ठरतं, यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत.
भालके यांच्या भूमिकेबाबत शरद पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. भालके ‘बीआरएस’च्या वाटेवर आहेत, याबाबत विचारले असता पवारांनी जास्त बोलणे टाळले.
पवार म्हणाले, “कोण पक्ष सोडून जातायत त्यांच्याबाबत आढावा घेतला. त्यात संबंधितांनी पक्ष सोडल्यानंतर फारशी चिंता करण्याची गरज आहे असे वाटत नाही.” यानंतर त्यांनी ‘बीआरएस’च्या (BRS) शेतकरी मुद्द्याचाही समाचार घेतला.
राज्यात ‘बीआरएस’ कुठल्याही पक्षावर टीका करत नाही. ते फक्त शेतकरी मुद्द्यांवर बोलतात. याबाबत पवार म्हणाले, “आता ते सांगतात आणि त्यांचे म्हणणे लोकांना पटत असेल तर पटू द्या. त्यासाठी वर्ष-सहा महिने जावे लागतात. त्यानंतर खरी स्थिती समोर येते.
अनुभव घेतल्यानंतर लोक नक्कीच निष्कर्षापर्यंत येतील. आज ज्या पद्धतीने वाटप सुरू केले आहे, त्याचा फायदा नक्की किती? त्याचा राज्याच्या अर्थकारणावर किती परिणाम होणार?
दर्जात्मक विकासावर काय परिणाम होणार? सरकारकडे असलेला पैसा विकासाला द्यायचा की वाटपाला घालवायचा, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज