mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारतनानांच्या आशीर्वादामुळे आम्ही सहकार शिरोमणी साखर कारखान्याची निवडणूक जिंकू; चेअरमन अभिजीत पाटील यांना विश्वास

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 7, 2023
in राजकारण, सोलापूर
पंढरपुरात उद्या शिवव्याख्याते प्रा.नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान; व्याख्यानातून प्रेरणा घेऊन युवा पिढी नक्कीच यशस्वी घडेल : अभिजीत पाटील

मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।

श्री विठ्ठलचे चेअरमन हे विठ्ठल परिवारातील विधानसभेचे उमेदवारी असतात. हे सत्य असतानाही 2004 साली स्व.भारतनाना भालके यांना खऱ्या अर्थाने परिवाराकडून चेअरमन कल्याणराव काळे यांनी खो देण्यासाठी प्रयत्न केला होता.

त्यावेळी विठ्ठल परिवारात दोन उमेदवार असल्याने मतविभागणी होऊन स्व.भारतनाना यांना पराभव पत्करावा लागला होता. असा आरोप चेअरमन अभिजीत पाटील यांनी काळे यांच्यावर केला आहे.

सहकार शिरोमणीचे निवडणुकीतील परिवर्तन पॅनलचे चिन्ह घड्याळ आले असून उमेदवाराच्या प्रचारासाठी रांझणी येथे प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.

सरकोली येथे सभासदासोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील, डॉ. बी.पी.रोंगेसर, दिपक पवार यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, श्री विठ्ठल सह.साखर कारखान्याचे संचालक मंडळ व सर्व उमेदवार उपस्थित होते.

पुढे बोलताना चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की,स्व.वसंतराव काळे यांच्या निधनानंतर सहकार शिरोमणीवर कल्याणराव काळे हे चेअरमन होते. आणि विठ्ठलवर स्व.भारतनाना भालके असे दोन्ही चेअरमन आपल्याच विठ्ठल परिवारातील होते.

परंतु भारतनाना भालके यांना कल्याणराव काळे यांनी 2004 साली सांगितली होते; की विठ्ठल कारखान्याचा जो चेअरमन असतो तोच तालुक्याचा आमदार असतो. परंतु कल्याणराव काळे यांनी त्यावेळी ऐकले नाही.

परिचारक पार्टीतील राजूबापू पाटील यांना इकडे आपल्या विठ्ठल परिवारात आणून आमदारकीची उमेदवारी दिली. त्यावेळीच खऱ्या अर्थाने आपला परिवार काळेंनी फोडण्याचे काम केले आहे.

आज मी सुद्धा भारतनाना भालके यांचा कार्यकर्ता आहे.त्यामुळे विठ्ठलच्या निवडणुकीमध्ये नानांचे आशीर्वाद मिळाले.त्याचप्रमाणे सरकोली गावातून सभासद व जनता सहकार शिरोमणी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आशीर्वाद देईल

व या नानांच्या आशीर्वाद मुळे आम्ही नक्कीच सहकार शिरोमणी साखर कारखान्याची निवडणूक जिंकू. असा आशावाद चेअरमन अभिजीत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी ऍड दिपक पवार यांनीही कल्याणराव यांच्यावर टीका करीत अनेक प्रश्न विचारले. स्व. वसंतदादांनी तयार केलेले निष्ठावंत सच्चे कार्यकर्ते सध्या तुमच्याकडे किती शिल्लक आहेत.हे तुम्हीच आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

तुम्ही निष्ठावंत कार्यकर्त्याचा गळा घोटला आहे. निष्ठा निष्ठा या नावाखाली निष्ठावंत सच्चा कार्यकर्त्यांना तुम्ही बाजूला सारले आहे. त्यामुळे निष्ठेच्या गोष्टी तुम्ही करू नका असे प्रतिपादन दीपक पवार यांनी सहकार शिरोमणी सरकोली येथील निवडणूक प्रारंभीच्या सभेमध्ये केले.

दीपक पवार पुढे बोलताना म्हणाले ,सभासद आणि कामगारांच हित तसेच या दोघांचे भविष्य व संसाराचा गाडा भविष्यकाळात उज्वल करण्यासाठी तसेच त्यांचे हित जोपासण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत .

भविष्यकाळाचा विचार करून सभासदांनी कामगार व सभासदांचे हित जोपासण्यास आमच्या सोबत यावे. सिताराम सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी अनेक लोकांकडून पैसे घेतले होते .त्यामुळे आजपर्यंत आमच्या संपर्कात आलेल्या आठ हजार लोकांचे 23 कोटी रुपये आजपर्यंत त्यांना मिळवून दिले आहेत.

राहिलेल्या तीनशे ते चारशे लोकांना सुद्धा या सहकार शिरोमणी निवडणुकीच्या विजय गुलाला नंतर मला तुम्ही संपर्क करा त्यांची सुद्धा पैसे परत घेण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.असा विश्वासही यावेळी त्यांनी दिला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अभिजीत पाटील

संबंधित बातम्या

पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

अनिल सावंत ‘स्वगृही’ तर भालके ‘नाथांच्या’ चरणी; मंगळवेढा-पंढरपूरच्या राजकारणात ‘विठ्ठल’ कोणाला पावणार?

April 12, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! मंगळवेढ्यात सख्खा भाऊच बनला ‘यमदूत’; कुऱ्हाडीच्या एका वाराने होत्याचे नव्हते झाले; खुनामागचं खरं कारण वाचून अंगावर येईल काटा

April 11, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

मंगळवेढ्यात राजकीय धमाका! अनिल सावंतांचे ‘शिवबंधन’; कार्यकर्त्यांच्या अनेक वर्षांच्या इच्छेची पूर्ती होणार

April 10, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढ्याच्या विकासासाठी ३ कोटी ४७ लाखांचा निधी मंजूर; आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश; ‘या’ कामांना मिळणार गती

April 8, 2026
Next Post
पुन्हा नोटाबंदी! 2 हजारांची नोट चलनातून बाहेर; आरबीआयचा मोठा निर्णय

कामाची बातमी! सोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार दहा हजार; प्रस्ताव पाठविण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदत

ताज्या बातम्या

मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

टवाळखोरांनो सावधान! मंगळवेढ्यात ‘निर्भया पथक’ फिरतेय; शाळा आणि बाजारपेठेत कडक गस्त

April 15, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 15, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा