मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कोरोना प्रादुर्भावाने आई अथवा वडील किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकाच्या शैक्षणिक खर्चासाठी दहा हजार रुपयांचा बालनिधी मिळणार आहे. याकरीता प्रस्ताव पाठविण्यास ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
३ ते १८ वयोगटातील प्रति बालकास
या निधीचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याकरिता जिल्ह्यातील कोविडमुळे एक वा दोन्ही पालक गमावलेल्या ३ ते १८ वयोगटातील प्रति बालकास शैक्षणिक शुल्क १० हजार रुपये बालकांच्या शैक्षणिक शुल्कासाठी वितरित करण्यात येणार असून,
३० जूनपर्यंत प्रस्ताव सादर करणे आवश्यक
लाभार्थ्यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे ता. ३० जूनपर्यंत प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. मुदतीनंतर येणाऱ्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.
या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा
लाभार्थीना प्रस्ताव सादर करण्यात काही तांत्रिक अडचणी आल्यास जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांना ७२१९१०४५०३ या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज