मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील बालाजी गोपाळ कोकरे (वय 30) याने राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची नोंद मंगळवेढा पोलिसांत झाली आहे.
दरम्यान, बालाजी कोकरे आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहिली होती. या चिठ्ठीत त्याने माझ्या मृत्यूस कोणीही जबाबदार नसल्याचे म्हटलं आहे.
त्यामुळे बालाजी कोकरे याने आत्महत्या नेमकी का केली याची माहिती समजू शकली नाही.
याबाबत मधुकर कोकरे यांनी पोलिसांत माहिती दिली. यामध्ये 25 मे रोजी येणकी येथील शेतात पिकास पाणी देत असताना सकाळी 11.30 वाजता ब्रम्हपुरी येथील राजेंद्र धोंडीराम कोकरे यांनी
फोन करुन कळविले की, तुमचा चुलत भाऊ गोपाळ गोविंद कोकरे यांचा मुलगा बालाजी गोपाळ कोकरे याने त्याच्या राहत्या घरी पत्र्याच्या अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
बालाजी याने पत्र्याच्या अँगलला गळफास घेतल्याने त्याचा मृतदेह त्या अँगलला तसाच अडकून होता.
दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसो पिंगळे हे करीत आहेत. बालाजी याने ही आत्महत्या नेमकी का केली याचे कारण अस्पष्ट आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज