टीम मंगळवेढा टाईम्स ।
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपचे जिल्ह्यातील दाेन खासदार, पाच आमदार आणि कार्यकर्ते सहभागी हाेणार असल्याचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख आणि जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी सांगितले.
भाजपने कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीबाबत विशेष दक्षता घेतल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रातील सीमावर्ती भागातील नेत्यांना या निवडणुकीत सहभागी करुन घेतले आहे. साेलापूर हा कर्नाटकच्या सीमेलगतचा जिल्हा आहे.
साेलापूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांवर विजयपूर आणि बेळगाव जिल्ह्यातील मतदारसंघातील प्रचाराची जबाबदारी साेपविली आहे.
भाजपचे आमदार सुभाष देशमुख हे शुक्रवारी दुपारी बेळगावकडे रवाना झाले. आमदार विजयकुमार देशमुख शनिवारी गेले आहेत.
आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार राम सातपुते, आमदार समाधान आवताडे हे रविवारी जाणार आहेत. खासदार डाॅ. जयसिध्देश्वर शिवाचार्य आणि खासदार रणजितसिंह निंबाळकर प्रदेश कमिटीकडून निराेप येताच कर्नाटकच्या प्रचारात सहभागी हाेतील, असे कल्याणशेट्टी यांनी सांगितले.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज