समाधान फुगारे । मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथील 65 वर्षीय कोरोना बाधीत महिलेचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला.तालुक्यातील कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे.तर आज दिवसभरात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
तालुक्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून तालुक्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या आज 289 वर पोहोचली आहे.तालुक्यातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज दि.15 ऑगस्ट रोजी 66 जणांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले आहेत. तसेच आज 3 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. 3 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट केलेल्या नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे आज पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले नाहित.
मयत झालेली व्यक्ती शिरनांदगी,ता.मंगळवेढा येथील 65 वर्षांची स्त्री असून त्यांना दि.11 ऑगस्ट रोजी सायंकाळी 06.43 वाजता सिव्हील हॉस्पीटल, सोलापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान दि.14 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांचे निधन झाले.त्यांचा कोव्हीड -19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेरपर्यंत 289
रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 159 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आज पर्यंत 127 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोणीही घराबाहेर पडू नये. गर्दी न करता आपण कोणत्याही संसर्गित व्यक्तीच्या संपर्कात येणार नाही आणि आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही, याची काळजी घ्यावी. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज