mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

धक्कादायक! गर्भवती महिलांचं इंजेक्शन गायी-म्हशींना; सहा जणांना अटक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 19, 2022
in राज्य
चिंताजनक! मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील जनावरात लंपीची लक्षणे? पशुधन अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी नमुने पाठवले

टीम मंगळवेढा टाईम्स ।

आरोग्याबाबत तुम्हाला सजग करणारी महत्वपूर्ण बातमी. गायी-म्हशीचं दूध आपण घरात सर्रासपणे वापरतो. मात्र हे दूध तुमच्या आरोग्यासाठी हानीकारकही ठरू शकतं.

कारण जनावरांच्या दूधवाढीसाठी केमिकल इंजेक्शनचा वापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

मोठ-मोठ्या बॉक्समध्ये असलेली ही औषधं, हा कुठल्या हॉस्पिटलमधील औषधांचा साठा नाही, तर ही आहेत ऑक्सीटोसीन इंजेक्शन्स. तसं पाहिलं तर ही औषधं महिलांच्या डिलिव्हरीसाठी वापरली जातात.

मात्र काही माफियांनी याचा वापर थेट दुभत्या जनावरांवर सुरू केलाय. गायी-म्हशींच्या दूध वाढीसाठी या औषधांचा सर्रासपणे बेकायदा वापर होतोय.

अंमली पदार्थ विरोधी पथक आणि अन्न औषध प्रशासनानं याची माहिती मिळताच मोठी कारवाई करत पुण्यातून तब्बल 53 लाखांची औषधं जप्त केलीयेत. यामागे पश्चिम बंगालमधील टोळी असून आतापर्यंत सहा जणांना अटकही करण्यात आलीय.

ऑक्सिटोसीन हे इंजेक्शन महिलांच्या डिलिव्हरीवेळी वापरलं जातं. यामुळे प्रसूती वेदना कमी होतात. मात्र हे इंजेक्शन गायी-म्हशींना दिल्यास त्या जास्त दूध देतात.

या इंजेक्शनच्या वापरामुळे जनावरांनी दिलेलं दूध मानवी शरीरासाठी घातक मानलं जातं. मात्र, त्याचा परिणाम मानवी शरीरावर होतो.

ते दूध प्यायल्यास अशक्तपणा, दृष्टीविकार, पोटाचे आजार, नवजात बालकांना कावीळ, गर्भवती महिलेला रक्तस्त्राव, अनैसर्गिक गर्भपात, श्वसनाचे विकार तसच त्वचेचे विकार असे गंभीर विकार होण्याची शक्यता आहे.

मात्र हे सगळे नियम पायदळी तुडवून पश्चिम बंगालची टोळी पुण्यात या केमिकलयुक्त इंजेक्शनची निर्मीती आणि विक्री करत होती. सकस आहार म्हणून दुधाकडे पाहिलं जातं.

मात्र काही माफियांनी पैसे कमावण्याच्या नादात आता दुधालाही बदनाम करण्याचा घाट घातलाय. अशा समाजकंटकांना कडक शिक्षा व्हायलाच हवी.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: जनावरे

संबंधित बातम्या

मोठी बातमी! स्फोटक रसायनाचा टँकर मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर झाला पलटी; सोलापूरकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली; आता वाहतूक सुरळीत सुरू

मोठी बातमी! स्फोटक रसायनाचा टँकर मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर झाला पलटी; सोलापूरकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली; आता वाहतूक सुरळीत सुरू

August 10, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना विचारणार ‘हे’ ५ प्रश्न; पडताळणीला सुरुवात, तुमचं नाव तर नाही ना?

August 10, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

कामाची बातमी! अकाऊंट होल्डरचा मृत्यू, नॉमिनीला ‘इतक्या’ दिवसांच्या आत पैसे मिळणार; जाणून घ्या RBI चे नवीन नियम

August 10, 2025
कत्तलखान्याकडे जाणारी ३१ जनावरे पकडली; मंगळवेढ्यातील दोघांसह नऊ जणांवर गुन्हा दाखल

पिसाळलेला कुत्रा म्हशीला चावला, कोण मेलं असेल? अन् महाराष्ट्रातील ‘या’ गावावर रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी लोकांनी का केलीय गर्दी?

August 9, 2025
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! एकही रुपया खर्च न करता मिळणार वर्षाला 36 हजार पेन्शन; कुठे कराल नोंदणी? कोणते शेतकरी ‘या’ योजनेसाठी पात्र आहेत?

August 10, 2025
शाळांची वेळ ठरविण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना; दोन शिफ्टमध्ये भरतील शाळा

मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमांच्या शाळेसाठी आता मोठा निर्णय; राष्ट्रगीतानंतर ‘हे’ गाणं बंधनकारक करण्यात आलं

August 7, 2025
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

तयारीला लागा! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली; निवडणूक आयोगाने दिली महत्वाची माहिती

August 6, 2025
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडिलांनी नवा मोबाईल न दिल्याने 16 वर्षीय मुलानं उचललं टोकाचं पाऊल; तातडीने रुग्णालयात नेलं पण…मोबाईलच्या व्यसनासंदर्भात सावध राहण्याची गरज

August 5, 2025
मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली तातडीची बैठक, विशेष अधिवेशनापूर्वी महत्वाची घडामोड; किती टक्के आरक्षण मिळणार?

खळबळ! एकनाथ शिंदे कर्णासारखे दानशूर, 40 वर्षाच्या राजकीय जीवनात असा माणूस पाहिला नाही; शरद पवारांचा आमदार शिंदेंच्या प्रेमात

August 5, 2025
Next Post
संधी! 10वी,12वी उत्तीर्ण धारकांना मोठ्या कंपनीत नोकरीची संधी, मंगळवेढ्यात विविध पदासाठी होणार मोठी भरती; येथे करा अर्ज

खुशखबर! अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून आता थेट मिळणार 'इतक्या' लाखाचे कर्ज; शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

ताज्या बातम्या

मोठी बातमी! स्फोटक रसायनाचा टँकर मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर झाला पलटी; सोलापूरकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली; आता वाहतूक सुरळीत सुरू

मोठी बातमी! स्फोटक रसायनाचा टँकर मंगळवेढा-सोलापूर महामार्गावर झाला पलटी; सोलापूरकडे जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली; आता वाहतूक सुरळीत सुरू

August 10, 2025
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

महिलांनो! अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींना विचारणार ‘हे’ ५ प्रश्न; पडताळणीला सुरुवात, तुमचं नाव तर नाही ना?

August 10, 2025
मंगळवेढा शहराच्या वैभवात भर! ‘हॉटेल रानवारा’ फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट’ उद्यापासुन नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होणार

मंगळवेढा शहराच्या वैभवात भर! ‘हॉटेल रानवारा’ फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट’ उद्यापासुन नागरिकांच्या सेवेसाठी सज्ज होणार

August 10, 2025
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

नागरिकांनो! तुमच्या घरात बसवा ‘हे’ उपकरण, शॉक लागूनही होणार नाही कोणाचा मृत्यू; सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जणांचा करंट लागून गेला जीव

August 10, 2025
ऑगस्टमध्ये ‘एवढ्या’ दिवस बंद राहणार बँका, खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची यादी

कामाची बातमी! अकाऊंट होल्डरचा मृत्यू, नॉमिनीला ‘इतक्या’ दिवसांच्या आत पैसे मिळणार; जाणून घ्या RBI चे नवीन नियम

August 10, 2025
मंगळवेढेकरांनो! प्रोफेशनल स्टाफ, A to Z हेअर स्टाईल माफक दरात, ‘हेअर मास्टर सलून’ आजपासून आपल्या सेवेत; सर्व सुविधा एकाच छताखाली; हेड शाम्पूवॉश मोफत

मंगळवेढेकरांनो! प्रोफेशनल स्टाफ, A to Z हेअर स्टाईल माफक दरात, ‘हेअर मास्टर सलून’ आजपासून आपल्या सेवेत; सर्व सुविधा एकाच छताखाली; हेड शाम्पूवॉश मोफत

August 10, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..