टीम मंगळवेढा टाईम्स ।
आवताडे शुगरचा ऊस गाळप हंगाम शुभारंभ करीत असताना, हा साखर कारखाना केवळ आणि केवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आम्हाला मिळाला आहे.
केवळ शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा कारखाना चालविला जाणार असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे समाधान होईल असा दर देणार असल्याचे आश्वासन आ.समाधान आवताडे यांनी दिले आहे.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा.जयसिद्धेश्वर महास्वामी, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.राम शिंदे, आ.सचिन कल्याणशेट्टी, माजी आ.प्रशांत परिचारक,
आ.रणजितसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शहाजी पाटील, आमदार सुभाष देशमुख, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, चेअरमन संजय आवताडे आदीजन उपस्थित होते.
पुढे बोलताना आ.आवताडे म्हणाले की, पंढरपूरच्या एमआयडीसीचा प्रश्न मंगळवेढ्यातील बसवेश्वर , चोखोबा स्मारक , मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याचा विषय लवकरच मार्गी असल्याचे आ.समाधान आवताडे यांनी सांगितले.
हजारो कामगारांच्या हाताला काम देणारी ही संस्था बंद पडता काम नये सुरू करण्यासाठी मदत केल्याचे त्यांनी सांगितले.
718 कोटींचा निधी पाणी उपसा सिंचन योजनेस मिळणार असून अत्यंत बरील लक्ष आपल्या मतदारसंघावर देवेंद्र फडणवीस साहेबांचे आहे. त्यासाठी अनेक त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न केले व येणाऱ्या काळात आपल्या हस्तेच उद्घाटन व्हावे असे आ.आवताडे म्हणाले.
मंगळवेढा तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रावर कोल्हापूर पद्धतीचे बेरेजस, मंगळवेढा व पंढरपूर येथील ग्रामीण रुग्णालय, पंढरपूर एमआयडीसीचा प्रकल्प, मंगळवेढा येथील महात्मा बसवेश्वर स्मारक व संत चोखामेळा स्मारक हे प्रश्न मार्गी लावाव्यात.
ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना मदत मिळावी व पौट साठवण तलाव 13 ते 14 गावांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा. माण नदीला कॅनालचा दर्जा द्यावा अशी मागणी देखील केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज