mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मोठा अपघात! कार्तिकवारी साठी पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत टेम्पो घुसला; सात वारकरी जागीच ठार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 31, 2022
in राज्य, सोलापूर
Breaking! पाठीमागून येणाऱ्या कारने पिकअप गाडीला उडवले, मंगळवेढ्यातील एकाचा मृत्यू; दोघेजण गंभीर जखमी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कार्तिकी एकादशी सोहळ्याला निघालेल्या वारकऱ्यांसोबत दुर्दैवी घटना घडल्याची घटना समोर आली आहे. पायी दिंडीत कार घुसली. यामुळे सात वारकरी जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

आठ जण जखमी झाले आहेत. वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील जठारवाडी गावातील आहेत.

ही दुर्दैवी घटना सांगोला तालुक्यातील जुनोनी गावानजीक घडली. तर हे वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी गावातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

सोलापुरात सांगोला-मिरज मार्गावर मोठा भीषण अपघात झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दिंडी सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील बायपास रस्त्याजवळ आली असता

मिरजेकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कार ( क्रमांक एमएट 12 DE 8938 ) दिंडीत घुसली आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे जाऊन थांबली.

यात आठ वारकऱ्यांचा मृत्यू झाला. अपघात झालेली कार सांगोला तालुक्यातील सोनंद गावातील असल्याचे समाजत असून यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

या अपघातात जखमी झालेल्या सहा वारकऱ्यांवर सांगोला येथे उपचार सुरु असून आहेत.

सांगोला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. मृत आणि जखमींची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे.

पायी चालणाऱ्या वारकऱ्यांना टेम्पोची जोराची धडक बसल्यामुळे हा अपघात झाला आहे. हे वारकरी कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडीचे असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे सर्व वारकरी कार्तिक वारीसाठी पंढरपूरला निघाले होते.

या वारकऱ्यांची दिंडी रस्त्याच्या एका कडेने ज्ञानोबा-माऊलीचा जप करत पुढे जात असताना अचानक रस्त्याने जाणारा एक टेम्पो थेट दिंडीत घुसला. या टेम्पोने अनेक वारकऱ्यांना चिरडले.

या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये पाच महिला, एक पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या घटनेने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

वाहनाच्या धडकेत मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी हे वृत्त कळताच तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: अपघात

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026
Next Post
सिध्देश्वर आवताडे यांच्या गावभेटी दौऱ्यास आजपासून सुरुवात

युवा वादळ! मंगळवेढ्याच्या राजकिय पटावरील दमदार मोहरा; माणसाला माणूस व मनाला मन जोडणारा, सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रिय चेहरा

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा