टीम मंगळवेढा टाईम्स ।
जिद्द व चिकाटी असेल तर यश मिळाल्याशिवाय राहत नाही. खांडेकर बंधू यांचे हॉटेल सुगरणची गगन भरारी कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार खासदार धनंजय महाडिक यांनी काढले आहेत.
हॉटेल सुगरण येथे त्यांनी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अँड.सुजित कदम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व माजी नगरसेवक अजित जगताप, विजय महाडिक, अँड.प्रकाश घुले, सतीश सावंत, संतोष पाटील सर आदीजन उपस्थित होते.
खासदार धनंजय महाडिक पुढे बोलताना म्हणाले की, खांडेकर बंधू यांनी मंगळवेढा व परिसरातील नागरिकांसाठी उत्तम असे हॉटेल उभे केले आहे.
माणसाच्या अंगी कष्ट करण्याची तयारी असेल तर त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळतेच, हॉटेल वेटर ते हॉटेल मालक अशी गगन भरारी खांडेकर बंधू यांनी घेतली आहे.
मोठे धाडस करून त्यांनी हॉटेल क्षेत्रात पदार्पण केले आहे. हॉटेल सुगरणच्या अल्पावधीतच दोन शाखा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज