mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भारतीय संघाने मालिका विजयी; घरेलू खेळपट्टीवर पहिली टी-20 सिरीज जिंकली

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 25, 2022
in मनोरंजन, राष्ट्रीय
भारताचा लंकेवर 7 गडी आणि 80 चेंडू राखून मोठा विजय; टीम इंडियासमोर श्रीलंकेची हाराकिरी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

ऑस्ट्रेलियाच्या १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व लोकेश राहुल स्वस्तात माघारी परतले. पण, विराट कोहली व सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताच्या विजयाचा पाया रचला.

सूर्यकुमार व विराट या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर हार्दिक पांड्याने त्याचे काम केले. भारताने ०-१ अशा पिछाडीवरून ही मालिका २-१ अशी जिंकताना विश्वविक्रम केला.

कॅमेरून ग्रीनचा तडाखा पाहून ऑस्ट्रेलिया आज धावांचा डोंगर उभा करेल असेच चित्र होते. पण, अक्षर पटेल व युजवेंद्र चहल यांनी भारताला पुनरागमन करून दिले.

त्यात ग्लेन मॅक्सवेलच्या विकेटने सामन्यात थोडासा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. अखेरच्या काही षटकांत टीम डेव्हिडने भारतीय गोलंदाजांना धु धु धुतले आणि तगडे आव्हान उभे केले.

कॅमेरून ग्रीनने २१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा चोपल्या. टीम डेव्हिड २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५४ धावांवर माघारी परतला. सॅम्स २८ धावांवर नाबाद राहिला.

भुवीने ३ षटकांत ३९ ( १ विकेट) धावा, जसप्रीतने ४ षटकांत ५० धावा दिल्या. अक्षरने ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. युजवेंद्र चहलनेही २२ धावांत १ विकेट घेतली.

प्रत्युत्तरात लोकेश राहुल ( १) पहिल्याच षटकात झेलबाद झाला. यष्टिरक्षक मॅथ्यू वेडने उत्तुंग उडालेला चेंडू अप्रतिमरित्या टिपला. रोहित शर्माने पुन्हा खणखणीत षटकार मारून मागच्या सामन्यातील अफलातून खेळीची झलक दाखवली.

पण, पॅट कमिन्सने त्याला १७ धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. सूर्यकुमार यादव व विराट कोहली यांनी भारताचा डाव सावरताना सुरेख फटकेबाजी केली. या दोघांनी ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली.

त्यांच्या फटकेबाजीमुळे भारत विजयाच्या नजीक येत होता.सूर्यकुमारने खणखणीत षटकार खेचून २९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. विराट व सूर्यकुमारने ६० चेंडूंत १०० धावांची भागीदारी पूर्ण केली.

१४व्या षटकात कॅमेरून ग्रीनने हे वादळ रोखले. ३६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकार खेचून सूर्यकुमार ६९ धावांवर झेलबाद झाला. भारताला १३४ धावांवर तिसरा धक्का बसला.

सूर्यानंतर विराटनेही ३३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. हार्दिक पांड्यानेही त्याला तोडीस तोड साथ देताना कांगारूंना हतबल केले. भारताला १८ चेंडूंत ३२ धावा करायच्या होत्या.

पॅट कमिन्सने १८व्या षटकात ११ धावा दिल्या आणि भारताला अखेरच्या दोन षटकांत २१ धावा करायच्या होत्या. हार्दिकने १९व्या षटकात हेझलवूडला पहिलाच चेंडू षटकार खेचला.

पण, विराटने दोन डॉट चेंडू खेळले अन् पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने चौकार अडवला. या षटकात १० धावा आल्याने आता ६ चेंडू ११ धावा भारताला करायच्या होत्या. विराटने पहिलाच चेंडू षटकार खेचला.

आता भारताला ४ चेंडूंत ५ धावा हव्या होत्या आणि दिनेश कार्तिकने एक धाव घेतली. हार्दिकने चौकार खेचून विजय पक्का केला.

हार्दिक १६ चेंडूंत २५ धावांवर नाबाद राहिला. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक २१ ट्वेंटी-२० सामने जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला. त्यांनी पाकिस्तानचा २० विजयाचा विक्रम मोडला.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: टीम इंडिया

संबंधित बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
आमदार शहाजी पाटील यांच्या एंन्ट्रीने युवा महोत्सवाला आली रंगत, खास शैलीत विद्यार्थ्यांशी साधला संवाद; म्हणाले…

अघोरी पूजेचा पर्दाफाश! माझ्या भाच्याला जीवे मारण्यासाठी उघडे-नागडे होऊन पूजा केली;  सांगोल्यात शहाजीबापूंचा अंगावर काटा आणणारा आरोप

September 5, 2026
रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

रक्षाबंधन आजच! दिवसभरात ‘या’ 5 मुहूर्तात कधीही बांधा राखी; फक्त ‘ही’ वेळ सांभाळा

August 28, 2026
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोठी बातमी! कोरोनानंतर आता पुन्हा एका आजाराने डोके काढले वर; रुग्णांची संख्या वाढतेय झपाट्याने, गेल्या 24 तासांत…

August 26, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

धक्कादायक! शिक्षिकेने ६ वर्षांच्या विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली; पुढच्याच क्षणी चिमुकल्याचा जागीच तडफडून मृत्यू

August 22, 2026
मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

मंगळवेढ्यात आज घुमणार देशभक्तीचा सूर! ‘सुरसंगम’ व ‘माजी सैनिक संघटने’तर्फे ‘मेरे देशप्रेमियों…’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन

August 15, 2026
Next Post
हजारो कुटुंबाच्या मदतीचा हात! मंगळवेढ्याच्या नवदुर्गा डॉ.सौ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड

हजारो कुटुंबाच्या मदतीचा हात! मंगळवेढ्याच्या नवदुर्गा डॉ.सौ.राजलक्ष्मी काळुंगे-गायकवाड

ताज्या बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 19, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 19, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा