mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

बहुचर्चित चोखोबा स्मारकासाठी जिल्हाधिकारी शंभरकरांचा हिरवा कंदील; 25 कोटीचा आराखडा तयार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 24, 2022
in मंगळवेढा, राजकारण
बहुचर्चित चोखोबा स्मारकासाठी जिल्हाधिकारी शंभरकरांचा हिरवा कंदील; 25 कोटीचा आराखडा तयार

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा शहरातील चोखोबा स्मारकासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रास्तावित स्मारक शासकीय जागेतील 1955 चौ.मी. जागेवर करण्याबाबत 25 कोटीचा प्रस्ताव तयार केला असून, तो लवकरच शासनास सादर करण्यात येणार आहे.

त्यासाठी हरकती व सुचना दि.26 सप्टेबरचा कालावधी निश्‍चीत करण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेतेखाली पंढरपूर तिर्थक्षेत्र विकास आराखडयात नव्याने समाविष्ठ करावयाच्या कामासाठी 29 ऑगष्ट रोजी बैठक घेण्यात आली.

त्यानुसार वारकरी संप्रादयाच्या प्रचार प्रसिध्दीच्या अनुसंघाने प्रास्तावित केलेल्या कामात चोखोबा स्मारकाचा आराखडा तयार करण्यात आला.

गेल्या अनेक वर्षापासून स्मारकांची मागणी प्रलंबित होती स्व.आ.भारत भालके व आ.समाधान आवताडे यांनी हिवाळी अधिवेशानात प्रश्‍न उपस्थित केला.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी 24 ऑगष्ट 2018 रोजी शिखर समितीच्या बैठकीत स्मारकाच्या कामाची जागा निश्‍चीत करुन आराखडा करण्याचे आदेश दिले होते.

परंतु, स्मारकावरुन वेगवेगळी मते असताना दि.19 जानेवारी 2022 रोजी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार, मुख्याधिकारी मंगळवेढयातील पदाधिकाऱ्यासमवेत बैठक घेतली.

त्यामध्ये स्मारक समाधी परिसरात व्हावे जेणेकरुन भविक पर्यटकास समाधी स्थळ व अन्य माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल.

मंगळवेढा शहरातील शासकीय कार्यालये बाहेर गेल्यामुळे शहरातील व्यवसायावर मोठा परिणाम झाला म्हणून, काही पोलीस वसाहतीजवळील जागा सुचविली होती.

व्यापाऱ्यांची उपजिविका कायम ठेवत पोलीस स्टेशन व गणेश मंडळाची जागा पुर्ववत ठेवत स्मारक करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली होती.

प्रत्यक्ष स्थळ 20 जानेवारी रोजी पाहणीसाठी मंगळवेढयात आले असताना आ.समाधान आवताडे, राहूल शहा, अजित जगताप, प्रविण खवतोडे, शशीकांत चव्हाण, प्रदीप खांडेकर, नंदकुमार पवार, अविनाश शिंदे, जयराज शेंबडे यांच्यासह

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत होऊन आ.आवताडे यांनी सर्वाना विश्‍वासात घेवून स्मारकाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आवाहन केले होते.

शहरवासीयाच्या प्रतिक्रिया देखील जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या होत्या. प्रास्तावित समाधी स्थळ विकसीत करण्याकरिता तिर्थक्षेत्र विकास कार्यक्रमाअंतर्गत समाधीस्थळ, पुर्नविकास व सुशोभिकरण करणे, समाधीस्थळ परिसरातील यासाठी

सि. सर्व्हे नं. 2292, 2293, 2294, 2295, 2282, 2283, 2278, 2276, 2285 ते 2291 या मिळकतीमधील 3172 चौ. मी. जागा उपलब्ध करण्यात आली.

त्यापैकी मंदीर व अंतर्गत रस्ता यासाठी 1217 चौ.मी जागा आवश्यक असल्याने 1955 चौ. मी. जागा स्मारकासाठी उपलब्ध होणार आहे.

त्यामध्ये जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, व नगरपालिकेच्या जागेचा समावेश आहे.

प्रास्तावित स्मारकामध्ये पुर्नविकास व सुशोभिकरणात स्मारक उभारणी, सभामंडप, बहुउददेशीय सभागृह, अभ्यासकेद्र,भोजनकक्ष, भक्त निवास रस्ते वाहनतळ शाळा बांधणे रस्ते सुशोभिकरण इ. कामाचा यात समावेश आहे. यासाठी 25 कोटीचा निधीची आवश्यकता आहे.

स्मारकामुळे व्यापारी गाळे कायम राहून शाळाचे रुप बदलणार आहे. नव्याने रोजगार उपलब्ध होणार आहे. मात्र, पंढरपूरचा आराखडा तयार करताना हद्दवाढ भागाचा समावेश करण्यात आला.

मंगळवेढयाच्या आराखडयाचा विचार करता हद्दवाढ भागाचा विचार करणे आवश्यक होते. हददवाढ भागातील अनेक नागरिक सोयीसुविधपासून वंचीत आहेत.

दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी, वारकरी, पालखी सोहळा प्रमुख, पत्रकार यांच्या प्रत्यक्ष पाहणीसाठी 19 ते 26 सप्टेबर या कालावधीत उपलब्ध असून त्याबाबत काही सुचना व हरकती जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या कार्यालयास सादर करण्याच्या सुचना नियोजन अधिकारी यांनी स्थानिक प्रशासनास दिल्या.

सभामंडप व बहुउददेशीय सभागृह 1.57,अभ्यासकेंद्र व भोजन कक्ष 1.37,भक्त निवास व व्यापारी संकुल 2.85, शाळा बांधणे 1.57, स्मारकाकडे जाणारे मार्ग 10.00, वाहनतळ 1.00, सुशोभिकरण 0.50 व जीएसटी 2.26 अशी 21.12 कोटीची रक्कम प्रास्तावित केली असून तीन वर्षातील भाडेवाढसहीत ते अंदाजपत्रक 24.92 कोटी करण्यात आले.(स्रोत:सकाळ)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: संत चोखामेळा स्मारक

संबंधित बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

मागेल त्याला टँकर! शेतातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये: आमदार समाधान आवताडे यांच्या अधिकाऱ्यांना कडक सूचना

October 4, 2026
मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे! मंगळवेढ्यात घोषणाबाजीसह शांततेच्या मार्गाने शहर व तालुका कडकडीत बंद; उपोषणाला शहर अन् तालुक्यातून प्रचंड पाठिंबा

खोट्या अट्रोसिटीच्या विरोधात मंगळवेढा शहर कडकडीत राहिले बंद; आमदार समाधान आवताडे यांच्या आश्वासनानंतर आंदोलन घेतले मागे

October 4, 2026
वाळू माफियांची मुजोरी तहसिलदारांच्या अंगावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

मंगळवेढ्यात संतापाची लाट! आजपासून तालुका बेमुदत बंद; खोटे ॲट्रॉसिटी गुन्हे मागे घेण्यासह १२ आरोपींच्या तात्काळ अटकेची जोरदार मागणी; संपूर्ण जिल्ह्याचे लागले लक्ष

October 3, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 4, 2026
Next Post
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात मशनरीचे दुकान फोडले, 11 लाखांचा मुद्देमाल केला लंपास; कॅमेऱ्यात बॉक्स चोरताना चोरटे कैद

ताज्या बातम्या

नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

पाणीटंचाई आणि चाऱ्याचे संकट! सर्व ८ मंडलांतील शेतकऱ्यांना मिळणार मदत; मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही; आ.आवताडे यांची मोठी ग्वाही

October 7, 2026
सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

सोलापूरचे नाव पुन्हा राज्यात उज्ज्वल! प्रा.डॉ. सागर पाटील यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार; शिक्षण क्षेत्रातील बहुमोल योगदानाची दखल

October 6, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

नागरिकांनो! ग्रामपंचायतीला किती निधी आला, कुठे खर्च झाला? आता मोबाईलवरच पाहता येणार सगळा हिशेब

October 6, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

प्राणघातक हल्ला! मंगळवेढ्यात शेतजमिनीच्या वादातून महिलेला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

October 6, 2026
दिपावलीचा दुसरा हप्ता कारखान्यांनी देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी; ऊस उत्पादक शेतकरी बालाजी गरड यांचे भावनिक आवाहन

मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी उपसरपंच बालाजी गरड यांची आक्रमक भूमिका; सर्व शेतकऱ्यांना विनाविलंब आर्थिक मदत व दुष्काळ निधी देण्याची मागणी

October 6, 2026
मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

मोठी बातमी! सिद्धेश्वर रणे यांच्याकडे मंगळवेढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची धुरा; खा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोपवली जबाबदारी

October 5, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..