टीम मंगळवेढा टाईम्स ।
शेतात जनावरे सोडल्याच्या कारणावरून एका ४५ वर्षीय महिलेस जातीवाचक शिवीगाळ करून तीचा विनयभंग केल्याप्रकरणी अंकुश जकाप्पा कटरे (रा.शिरनांदगी ) याच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी ४५ वर्षीय महिलेने शिरनांदगी शिवारात जनावरे चारणेकरीता दोन महिन्यापुर्वी पैसे देवून जमीन घेतली आहे.
या जमिनीत फिर्यादी तथा पिडीता जनावरे चारत असते. दि .३० रोजी दुपारी ३.०० वा. सचिन होवाळे यांनी फिर्यादीस फोन करून आपली जनावरे चरावयाच्या जमिनीत आरोपी अंकुश कटरे याने जनावरे सोडली आहेत.
तो ऐकत नाही, तुम्ही येवून सांगा असा कॉल केल्याने फिर्यादी तेथे येवून आरोपीस जनावरे तु का सोडतो आम्ही पैसे देवून जमीन घेतली आहे असे म्हणताच
सदर फिर्यादीस तुझा काय संबंध असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करीत फिर्यादीच्या अंगावरील साडी ओढून तुझ्यावर अत्याचार करेन असे धमकावून अंगाशी झोंबाझोंबी करून मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले.
यावेळी फिर्यादी आरडा ओरड करताच तेथून आरोपीने पळ काढला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस अधिकारी करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज