mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कामाचा माणूस! राज्यातील सत्ताबदलामुळे मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नासह तालुक्याचा सर्वांगीण विकास होणार; आमदार आवताडेंचा शब्द

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
July 8, 2022
in मंगळवेढा
सभासदांनो! नेतृत्व व प्रामाणिक पणाचा विरोधकात अभाव, आमदार समाधान आवताडे यांचा दावा; कारखान्याच्या कर्जासंबंधी आकडेवारी समोर

टीम मंगळवेढा टाईम्स। 

राज्यातील सत्ताबदलामुळे मंगळवेढ्याच्या पाणी प्रश्नासह तालुक्याचा व मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी केले आहे.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2022/07/VID-20220707-WA0104.mp4

श्री.संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारसभेत ते रड्डे, भोसे, हुन्नूर, नंदेश्वर येथे बोलत होते.

नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत असताना फडणवीसांनी मला बोलावून घेतले.

त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना सांगितले की, मंगळवेढा उपसा सिंचन योजनेची फाईल तुमच्याकडे आहे, तेवढी मार्गी लावा.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2022/07/VID-20220706-WA0012.mp4

या योजनेबाबत मी मंगळवेढेकरांना पोटनिवडणुकीत शब्द दिला आहे,” असे पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी सांगितले.

दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारसभेत आमदार समाधान आवताडे यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले की, राज्यातील सत्ताबदलामुळे मंगळवेढ्याचा पाणीप्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहेत, त्यामुळे गेली अनेक वर्ष रखडलेली पाणी योजना मार्गी लावण्यासाठी दामाजी कारखान्याच्या निवडणुकीनंतर पाठपुरावा करून मंजुरी मिळवणार आहे, असा विश्वास आवताडे यांनी व्यक्त केला.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2022/07/VID-20220705-WA0074.mp4

आमदार आवताडे म्हणाले की, वीस साखर कारखाने निर्माण व्हावेत, एवढा माझा उद्योग आहे. मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांची फिकीर असल्याने हा उद्योग भावावर सोपवून साखर कारखान्यातून सभासदाचे हित साधण्याचा प्रयत्न केला.

कारखान्यावर कर्जाचा डोंगर असताना आमचे संचालक मंडळ सत्तेवर आले. सहा वर्षांच्या काळात एकही हंगाम बंद न ठेवता कारखाना चालवून दाखवला. मी शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतणारा नसून गोरगरिबांच्या संसाराची चूल पेटवणारा लोकप्रतिनिधी आहे.

माझा सभासदांवर पूर्ण विश्वास असल्यामुळे मला पराभूत करण्यासाठी एकमेकांच्या सावलीला न जाणारे सर्वजण एकत्र आले. पण, ज्यांनी मला कारखान्याचा अध्यक्ष व आमदार केले.

जोपर्यंत त्यांच्या मनात आहे, तोपर्यत मला कोणीही पराभूत करून शकत नाही. माझ्यावर टीका करणारे फोनवर बोलताना चांगले बोलतात. चांगल्या कामासाठीचा योग्य सल्ला माझ्याशी न बोलता वृत्तमानपत्रातून सभेतून देतात.

चुकीच्या पद्धतीने आधार नसलेले बिनबुडाचे आरोप करून टीका करत असले तरी सभासद अशा टीकेला महत्त्व देत नाहीत, असे आवताडे यांनी नमूद केले.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आमदार समाधान आवताडे

संबंधित बातम्या

धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

माणुसकीला काळीमा! अवघ्या ३ वर्षांच्या बालिकेचा विनयभंग; मंगळवेढ्यात संताप, १७ वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात

June 17, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो सावधान! नळाला कॉक लावा, अन्यथा थेट दंडात्मक कारवाई; नगरपरिषदेचा कडक इशारा

June 18, 2026
शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

June 16, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

जिल्हा परिषद शाळा बळकटीकरणासाठी डोंगरगावच्या सुपुत्राचे स्तुत्य पाऊल; वीर इंटरनॅशनल अकॅडमीचा आज भव्य उद्घाटन सोहळा

June 16, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

मंगळवेढ्यात भरधाव कारचा थरार! यू-टर्न घेताना कारने दुचाकीला उडवले; शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत; नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत केले मदतकार्य

June 16, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

मंगळवेढा पोलीस ठाण्यात मोठे फेरबदल! ५ कर्मचाऱ्यांची बदली, तर ५ नवीन अंमलदार रुजू; पहा कोणाची कुठे झाली बदली?

June 15, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मंगळवेढ्यात खळबळ! तुकाराम मुंढेंच्या धसक्याने स्वीट मार्टमधील मलाई, पेढा अन् पनीर गायब; मग आतापर्यंत नागरिक जे खात होते ते काय होतं?

June 15, 2026
शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन

शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण, अन्नदान ते ‘खेळ पैठणीचा’; सिताराम भगरे (मेंबर) यांच्या वाढदिवसानिमित्त आज मंगळवेढ्यात भव्य सामाजिक उपक्रमांचे आयोजन

June 15, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

सरपंच निवड जनतेतून तर ग्रामपंचायत सदस्यांचे काय महत्त्व? ‘हम करे सो कायदा’ म्हणत मनमानी कारभार; प्रहार संघटनेचे राकेश पाटील यांचा थेट सरकारला सवाल

June 15, 2026
Next Post
सभासदांनो! आमची सत्ता येताच कारखान्याचे सभासदत्व खुले करणार; शिवानंद पाटील यांची मोठी घोषणा

सभासदांनो! आमची सत्ता येताच कारखान्याचे सभासदत्व खुले करणार; शिवानंद पाटील यांची मोठी घोषणा

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सोलापुरात ‘सिंघम’ इफेक्ट! आता जनतेचाच थेट वॉच; दररोज येताहेत भेसळीच्या ढीगभर तक्रारी; सोलापूर FDA कडून दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू

June 18, 2026
रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

June 17, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

राज्य सरकारची मोठी घोषणा! महिला बचत गटांना मिळणार अडीच एकर जमीन आणि 1 लाखांचं अनुदान; काय आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये?

June 18, 2026
धक्कादायक! मंगळवेढा येथून अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल

माणुसकीला काळीमा! अवघ्या ३ वर्षांच्या बालिकेचा विनयभंग; मंगळवेढ्यात संताप, १७ वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात

June 17, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो सावधान! नळाला कॉक लावा, अन्यथा थेट दंडात्मक कारवाई; नगरपरिषदेचा कडक इशारा

June 18, 2026
शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

शिक्षणाचा नवा पॅटर्न! डोंगरगावात ‘वीर अकॅडमी’ सुरू; उद्घाटन सोहळ्याला मान्यवरांची मांदियाळी

June 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..