टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रात 12वीच्या निकालानंतर 10वीचा निकाल देखील अपेक्षित वेळेआधी जाहीर होईल अशी आस विद्यार्थी, पालकांना लागली आहे.
दरम्यान काही मीडीया रिपोर्ट्सकडून 15 जूनला दहावीचा निकाल लागेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता मात्र राज्य शिक्षणमंडळाने आज 15 जून दिवशी निकाल जाहीर होणार नसल्याचं स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल आठवडाभरापूर्वी लागल्यानंतर आता दहावीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहाचली आहे.
यंदा बोर्डाच्या परीक्षा राज्यात कोरोना संकटाच्या सावटाखालीच झाल्या आहेत त्यामुळे निकाल कसा लागेल याची धाकधूक वाढली आहे.
India Today कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांचे शिक्षण मंडळाच्या प्रवक्त्यांसोबत बोलणी झाली आहेत यामध्ये 15 जूनला निश्चितच निकाल जाहीर करण्याचा बोर्डाचा विचार नाही तसेच अद्याप 10 वी निकालाच्या तारखेची घोषणा देखील झालेली नाही.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जून महिन्याच्या अखेरीपर्यंत दहावीचा निकाल लागू शकतो असे संकेत दिले होते.
आतापर्यंत बोर्डाच्या निकालाचा इतिहास पाहता तारीख ही किमान 1 दिवस आधीच जाहीर केली जाते त्यामुळे आता 15 जूनला तरी निकाल नसेल असेच चित्र आहे.
10 वीचा निकाल कसा पहाल?
दरम्यान दहावीचा निकाल यंदा 12वी प्रमाणेच बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स msbshse.co.in, hscresult.mkcl.org, mahresult.nic.in. वर पाहता येणार आहेत.
निकाल पाहण्यासाठी तुमच्याकडे तुमचा रोल नंबर आणि आईचं नाव ही माहिती तयार ठेवा.
यंदा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधी मध्ये पार पडलेल्या 10वीच्या परीक्षेत अंदाजे 17 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. आता त्यांना निकालाचे वेध लागले आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज