mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

कौतुकास्पद! मंगळवेढ्यातील ‘या’ महाविद्यालयास नॅक कमिटीकडून B++ मानांकन; ग्रामीण भागात अशी ग्रेड मिळवणारे एकमेव कॉलेज

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 17, 2022
in मंगळवेढा, सोलापूर
मुलांना अभ्यासाची व शाळेची आवड, ओढ कायम राहण्यास सुरुवात होणार; मंगळवेढ्यातील ‘ही’ शाळा बाराही महिने सुसाट धावणार

टीम मंगळवेढा टाईम्स। 

मंगळवेढा येथील श्री.विद्या विकास मंडळ संचलित, श्री संत दामाजी महाविद्यालयाचे दिनांक ७ व ८ जून २०२२ रोजी बेंगलोर येथील

राष्ट्रीय मूल्यांकन आणि श्रेयांकन परिषद (NAAC) कमिटीकडून मूल्यांकन करण्यात आले होते. सन १९७८ साली स्थापन झालेल्या व अर्धशतकाकडे वाटचाल करत असलेल्या,

श्री संत दामाजी महाविद्यालयास नॅक पिअर टिमकडून थर्ड सायकल मध्ये २.९५ गुणांसह B++ हे मानांकन मिळाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफे. डॉ.एन.बी. पवार यांनी दिली.

यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या कार्यक्षेत्रातील ग्रामीण भागातील अशी (ग्रेड) मानांकन मिळवणारे दामाजी महाविद्यालय हे एकमेव आहे.

महाविद्यालयास मिळालेल्या यशामध्ये संस्था,  वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक, आजी-माजी विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे योगदान आहे.

स्वर्गीय रतनचंद शहा यांच्या ध्येय धोरणानुसार मार्गक्रमण करत असताना ही कामगिरी म्हणजे कॉलेजच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहली जावी अशी आहे असेही ते म्हणाले.

दामाजी महाविद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच कायमस्वरूपी आपली समाजाशी नाळ कायम स्वरूपी जुळवून ठेवली असल्यानेच सदरचे यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे त्यांचा सर्वांगिण विकास करण्यासाठी संस्था सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे संशोधनावर भर देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सर्व भौतिक सुविधा देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

तसेच बी ए आणि बी कॉम बरोबरच बी एस्सी सुरू झाल्याने मूल्यांकनात उत्तम अशी भरारी घेऊ शकलो असेही त्यांनी सांगितले.

जेव्हा सन २००४ मध्ये महाविद्यालयाचे पहिल्यांदा नॅक मूल्यांकन झाले तेव्हा महाविद्यालयास C++ अशी ग्रेड मिळाली होती त्यानंतर दुसऱ्या वेळी सन २०१६-१७ मध्ये महाविद्यालयास B ग्रेड मानांकन प्राप्त झालेले होते.

तर थर्ड सायकलमध्ये मात्र सुरवातीच्या काळातील उणीवा दुर करून सध्या B++ (ग्रेड) मिळवून दामाजी महाविद्यालयाने सोलापूर जिल्हयात वेगळा ठसा उमटवून नावलौकिक प्राप्त केला आहे.

पण पुढील काळात दामाजी महाविद्यालयास A++ हे मानांकन प्राप्त करू असे आश्वासन देखील डॉ पवार यांनी दिले.

महाविद्यालयाच्या या कामगिरीबद्दल श्री विद्या विकास मंडळाच्यावतीने प्राचार्य,नॅक समन्वयक,सेव्हन क्रॅटरीया मधील सर्व सदस्य,

उपप्राचार्य,पर्यवेक्षक यांचेसह सर्व प्राध्यापक,कार्यालयीन- शिक्षकेतर कर्मचारी यांचे  संस्थेचे मार्गदर्शक राहुल शहा,उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील,किसनराव गवळी,

ॲड रमेश जोशी,डॉ मोहन कुलकर्णी, यादव आवळेकर, डॉ अशोक सुरवसे, संस्थेच्या सर्व सभासदांनी सर्वांचे अभिनंदन केले नॅक समन्वयक म्हणून प्रा.डॉ परमेश्वर होनराव यांनी काम पाहिले यावेळी सर्व विद्यार्थ्यांना पेढे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: श्री संत दामाजी महाविद्यालय

संबंधित बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

साप चावला तर जबाबदार कोण? मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ शाळेतील धोकादायक इमारतीच्या अवशेषांवरून पालकांचा प्रशासनाला थेट सवाल

August 30, 2026
धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

धर्मगावच्या शिरपेचात मानाचा तुरा! बहुजन साहित्य संघाच्या राज्य संमेलनात कै. बाबुराव जाधव विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार

August 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

राखी पौर्णिमेच्या दिवशीच काळाचा घाला: बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या भावाचा भीषण अपघातात मृत्यू; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

August 29, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ ४ तालुक्यांत उभारणार १२ कृषी अवजार बँका; संस्थांकडून प्रस्ताव आमंत्रित

August 29, 2026
खास योजना! फक्त 90 दिवसांसाठी 9 टक्के सर्वाधिक व्याजदर; विठाई परिवार अर्बन बँकेची नवरात्रोत्सवानिमित्त घोषणा

विठाई परिवार बँकेचा उद्या तिसरा वर्धापन दिन; अवघ्या ३ वर्षांत १५० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण; मोफत आरोग्य तपासणी आणि महिलांसाठी रक्षाबंधन विशेष ठेव योजना जाहीर

August 27, 2026
Next Post
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, 'या' शाळेतील प्रकार; कारवाईसाठी 'प्रहार' संघटना आक्रमक

ताज्या बातम्या

महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! मोबाईलवरील ई-पीक पाहणीची डोकेदुखी मिटली; महसूल यंत्रणेवर जबाबदारी

September 1, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

दारूचे व्यसन ठरले आईच्या जीवावर; पैसे न दिल्याने पोटच्या मुलाने आईला संपवले, आरोपी गजाआड

September 1, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात लवकरच फिरणार ‘बुलडोझर’; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश; ‘या’ चौकात होणार कारवाई

August 31, 2026

जमीन मालकांसाठी मोठी खूशखबर! वारंवार मोजणीच्या त्रासातून अन् खर्चातून मुक्तता; शासकीय कार्यालयांमध्ये पुन्हा मोजणीची अट रद्द

August 31, 2026
​स्मृतीवंदन! स्व.सुभाषराव शहा यांच्या स्मृतींना ‘सेवाकार्याने’ अभिवादन; १४ व्या पुण्यस्मरणानिमित्त विविध उपक्रम

रतनचंद शहा बँकेचे माजी चेअरमन स्व. सुभाषराव शहा यांची आज ८२ वी जयंती; मंगळवेढ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

August 31, 2026
कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य साधून ‘सायकल बँक’ उपक्रम सुरु; आज विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन

मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती कै.भगवानराव भाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त वृद्धाश्रमात ‘मिष्टान्न भोजनाचे’ आयोजन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा आदर्श

August 31, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..