टीम मंगळवेढा टाईम्स ।
श्री.संत दामाजी सहकारी संचालक साखर कारखान्याच्या मंडळाचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग आला आहे.
२१ संचालक निवडीसाठी ही निवडणूक होत आहे. दि.१२ जुलै रोजी मतदान होणार असून १४ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे.
या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दि.३ ते ९ जून या काळात सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत फक्त निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात मिळणार आहे.
मिळालेल्या नामनिर्देशनपत्रांची यादी त्या त्या दिवशी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याची छाननी १० जूनला सकाळी ११ वाजल्यापासून प्रसिद्ध करण्यात येईल.
जे नामनिर्देशन पत्र ग्राह्य होतील, त्याची यादी दि.१३ जूनला निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
यासाठी मंगळवेढा प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर हे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दि.१३ ते २७ जून या काळात मागे घेता येतील. निवडणूक चिन्हांचे वाटप दि.२८ जून रोजी होणार असून, मतदान मंगळवार १२ जुलै रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी आणि निकाल गुरुवार, दि.१४ जुलै करण्यात येणार आहे.
उत्पादक सभासद मतदारसंघात मंगळवेढा, ब्रह्मपुरी, मरवडे, भोसे, आंधळगाव या पाच गटात प्रत्येकी ३ प्रमाणे १५ संचालक निवडले जाणार आहेत.
तसेच मतदार संघ क्र. २ मध्ये वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था एक जागा राहील. मतदार संघ क्र .३ मध्ये अनुसूचित जाती जमातीकरिता एक जागा तर मतदारसंघ क्र. ४ मध्ये महिला राखीव प्रतिनिधी दोन जागा असतील.
मतदार क्र. ५ इतर मागासवर्गीय प्रतिनिधी एक जागा, मतदारसंघ क्र.६ मध्ये भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी एक जागा अशा एकूण २१ जागांसाठी निवडणूक होत आहे.(स्रोत:लोकमत)
४१ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम
एक वर्षापासून दामाजीच्या निवडणुकीची प्रतीक्षा आहे. कोरोनामुळे ही प्रक्रिया लांबली होती ; मात्र आज कारखान्याच्या निवडणूक कार्यक्रमावर शिक्कामोर्तब झाले. कारखान्याचे निवडणूक अधिकारी मंगळवेढ्याचे प्रांताधिकारी आणि निवडणूक प्राधिकरण यांनी दामाजी कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम काल जाहीर केला.
तब्बल ४१ दिवसांचा हा निवडणूक कार्यक्रम राहणार आहे. यामुळे आता आजपासून इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज