mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सर्वसामान्य बेजार! बुलेटच्या सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज बंद होणार; एका दिवसात ३४६ बुलेट चालकांवर कारवाई

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 2, 2022
in क्राईम, राज्य
खळबळ! वाहने अडवून पैसे वसूल करणारा मंगळवेढ्यातील तोतया पोलीस ताब्यात

टीम मंगळवेढा टाईम्स ।

बुलेट सायलेन्सर मोठ मोठ्याने वाजवून रस्त्यावरून रुबाबात फिरणाऱ्या बुलेटस्वारांवर पुणे वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बुलेट सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटस्वारांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

एकाच दिवसात तब्बल ३४६ बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली.

विशेष म्हणजे सायलेन्सर प्रकरणी बुलेट चालकांवर दोन वेळेस कारवाई झालेली असेल, तर आता यापुढे सायलेंसर बदलून देणाऱ्या गॅरेज चालक,

मालकाला सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली.

बुलेट रुबाबात चालवण्या बरोबरच त्याचा सायलेन्सर किती मोठ्याने वाजतो याची स्पर्धा बुलेट स्वारांमध्ये असते. त्यामुळे कर्णकर्कश आवाजाने गल्ली-बोळात तरुण फेऱ्या मारताना हमखास दिसतात.

याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होतो. बुलेट स्वारांना काही बोलल्यास अरेरावीवर येतात. त्यामुळं वाहतूक पोलीस देखील अनेकदा नरमाईची भूमिका घेताना दिसतात.

परंतु, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी कारवाईला गती दिली आहे.

पोलीस आयुक्तालयातील १३ वाहतूक विभागामार्फत बुलेट स्वारांवर कारवाई करण्यात आली. यात, एकूण ३४६ जणांवर कारवाई करत ३ लाख ४६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सांगवी – ८४, हिंजवडी- ४४, निगडी- ६०, चिंचवड- २९, पिंपरी- १५, भोसरी- १, चाकण – २८, तळेगाव, देहूरोड – ९, दिघी, आळंदी – १०, तळवडे – २०, वाकड – २१, तळेगाव – ४, म्हाळुंगे – २१ अशा एकूण – ३४६ बुलेट स्वारांवर कारवाई करण्यात आलीय.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बुलेट

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

बळीराजाला मोठा दिलासा! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ चार गावांतील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला; कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये २१ शेतकऱ्यांचा समावेश

July 23, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! पतीच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय आईने १० महिन्यांच्या चिमुरडीला संपवले; सोलापूर जिल्ह्यातील घटना

July 21, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

देवस्थान लुटलं! ‘या’ मंदिरात तब्बल 60 कोटींचा महाघोटाळा; तपासासाठी आलेल्या महिला ऑफिसरने मारला डल्ला

July 22, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

रक्तदानातून घडणार सेवाभावी पांडुरंगाचे दर्शन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळगावात महारक्तदान शिबिर; करुणा शिवशरण यांचा स्तुत्य उपक्रम

July 21, 2026
Next Post
मोठी बातमी! मंगळवेढ्यात प्रियकराच्या मदतीने केला शिक्षक पतीचा खून, पत्नीने रचला आत्महत्येचा बनाव; असा झाला उलगडा

मंगळवेढ्यात हुर्रे म्हणल्याचा जाब विचारल्यानंतर लोखंडी पाईपने एकास मारहाण

ताज्या बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

ब्रेकींग! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांच्या ‘कास्ट व्हॅलिडिटी’बद्दल सरकारने घेतला मोठा निर्णय

July 29, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

मंगळवेढ्यासाठी दुःखद बातमी! कोकणात ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

July 29, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
जयश्री महिला अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीचा आज मंगळवेढ्यात लोकपर्ण सोहळा; सर्व बँकिंग सुविधा आता एकाच छताखाली

वाटचाल सोनपावलांची! जयश्री महिला अर्बन बँकेचा आज पहिला वर्धापनदिन; बँकेची सोने तारण व ६ वर्षात दाम दुप्पट योजना झाली लोकप्रिय

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणार; ‘या’ तारखेची मतदार यादी स्थगित? पाहा नवीन वेळापत्रक

July 27, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा