mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मराठा समाजाच्या सोयीसवलती बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विधानपरिषदेत निवेदन; ‘या’ उमेदवारांना सेवेत सामावून घेणार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 24, 2022
in राज्य
महाविकास आघाडीत मोठी घडामोड; शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी, वाचा काय आहेत पक्षादेश?

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असला तरी मराठा समाजाच्या उत्कर्षासाठी ज्या सोयी-सवलती आहेत त्या सुरूच राहणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.

विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांनी न्यायप्रविष्ट असलेला मराठा आरक्षणाचा विषय, प्रलंबित सोयीसवलती, निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्त्या, मृत्युमुखी पडलेल्या मराठा उमेदवारांच्या वारसांच्या मदतीबाबत सूचना क्रमांक 17 नुसार निवेदन दिले.

त्याला अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातून उत्तर दिले.

सर्व जिल्ह्यांत वसतिगृहे उभारणार

मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सर्व जिह्यांमध्ये वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. नोंदणीकृत संस्थांना वसतिगृहे चालवण्यासाठी सरकारी व इतर इमारती भाडय़ाने देण्यात येणार आहेत.

त्यापैकी 28 ठिकाणी इमारती निश्चित झाल्या असून 14 ठिकाणी वसतिगृहे चालवणाऱया संस्थांही निश्चित झाल्या आहेत. सात ठिकाणी वसतिगृहांचे उद्घाटनही झाले आहे.

मराठा समाजातील विद्यार्थांसाठी शिष्यवृत्तीसाठी योजना सुरू असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

सारथी संस्थेला 2018 पासून 2021-22 पर्यंत 124.95 कोटी देण्यात आले आहेत. आण्णासाहेब आर्थिक विकास मंहामंडळाला 2018 मध्ये 70 कोटी रुपये देण्यात आले असून 2021-22 साठी 50 कोटींची तरतूद असून 100 कोटी रुपये पुरवणी मागण्यांद्वारे उपलब्ध करण्यात आले आहेत.

कौशल्य विकास विभागामार्फत सारथीसाठी 20 कोटी रुपये देण्यात आले आहेत.

मराठा समाजाच्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या 36 जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाखांचे अर्थसाह्य करण्यात आले असून त्यांच्या वारसांना एसटी महामंडळत नोकरी देण्यात येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.

नियुक्ती न मिळालेल्या उमेदवारांना सेवेत सामावून घेणार

मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी संविधानात योग्य सुधारणा कराव्यात, अशी शिफारस करणारा ठराव केंद्र सरकारला पाठवण्यात आला आहे.

एसईबीसी वर्गातून नियुक्ती न मिळालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2 हजार 125 उमेदवारांना शासन सेवेत सामावून घेण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी निवेदनातून दिली.(स्रोत:सामना)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सकल मराठा समाज

संबंधित बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार; ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय

May 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मेहनत विद्यार्थ्यांची, मलिदा चोरांचा! NEET पेपरफुटीच्या टेन्शनमुळे १९ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

May 29, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

May 29, 2026
राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

राजकीय खळबळ! मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट अन् मंगळवेढ्यात चर्चांना उधाण; बबनराव आवताडे कमळ हाती घेणार? काय घडलं ‘त्या’ भेटीत?

May 28, 2026
नागरिकांनो! उद्यापासून देशभरात पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार; मोदी सरकारची मोठी घोषणा

डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाकडून नियम-अटी जाहीर; शेतकऱ्यांची गैरसोय टळणार

May 25, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! नीट पेपरफुटी प्रकरणात आला नवा द्विस्ट, परीक्षेनंतर नोट्स, कागदपत्रे रद्दीत विकली

May 25, 2026
जुलै अखेरपर्यंत राज्यातील शिक्षकांच्या बदल्या

संतापजनक! लेकराच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या…” NEET विद्यार्थ्याच्या वडिलांचा आक्रोश; सिस्टिमवर संताप

May 24, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

भयंकर! लग्नाला विरोध केल्याने मुलगा संतापला, आईला जिवंत जाळलं; पोलिसांकडून आरोपी मुलाला अटक

May 24, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

खळबळजनक! मंगळवेढ्यात ‘नीट’ पेपर फुटीचे लोन? निकाल लागण्यापूर्वीच बॅनरबाजी करणारे ‘ते’ कोचिंग क्लासेस CBI च्या रडारवर?

May 22, 2026
Next Post
मंगळवेढ्यात आज गुरू मोबाईल हार्डवेअर अँड सॉफ्टवेअरचा उद्घाटन सोहळा; सर्व मोबाईलची दुरूस्ती एकाच छताखाली

मोबाईलधारकांनो! तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता गूगल 'या' अँप्सद्वारे चोरी करतोय डेटा; रिसर्चमधून मोठा खुलासा

ताज्या बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

तब्बल पावणे सतरा लाखांचा गैरव्यवहार; ग्रामपंचायतीच्या सरपंचांचे थेट निलंबन, विभागीय आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय

May 30, 2026
राजनंदिनी महिला ग्रामीण बँकेचा आज मंगळवेढ्यात भव्य उद्घाटन सोहळा; निराधार महिलांना इतरांपेक्षा एक टक्का कमी व्याजदर

मंगळवेढ्यात सुवर्णसंधी! ‘राजनंदिनी महिला ग्रामीण पतसंस्थे’त विविध पदांसाठी थेट भरती; रविवारी मुलाखती

May 29, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मेहनत विद्यार्थ्यांची, मलिदा चोरांचा! NEET पेपरफुटीच्या टेन्शनमुळे १९ वर्षांच्या तरुणाची आत्महत्या; डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगले

May 29, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

May 29, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..