टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीज तारा तुटणे, पोल पडणे किंवा जमिनीवर लोंबकळणे, फ्यूज पेट्या व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघड्यावर पडणे अशा वीज सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या यंत्रणेची माहिती मोबाईलच्या व्हॉट्स अँपद्वारे द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी व्हॉट्सअँप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यावर फक्त वीजवितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती – तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत.
या क्रमांकावर नागरिकांना कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉट्स अँपद्वारे माहिती द्यावी.
एसएमएस’द्वारे’ माहिती स्वीकारली जाईल
तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉट्स अँप नाहीत त्यांनी ‘ एसएमएस ‘ द्वारे या माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.
यासोबतच महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावरही सध्या सुरू असलेली ही सेवा उपलब्ध आहे. व्हॉट्स अँपद्वारे प्राप्त झालेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधीत विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येत आहे.
त्याप्रमाणे वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधीत तक्रारकर्त्यांना व्हॉट्स ॲपद्वारेच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येत आहे.
महावितरणच्या या उपक्रमाला सार्वजनिक वीज सुरक्षेसाठी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.
या क्रमांकावर संपर्क साधा…
सोलापूर जिल्ह्यासाठी ७८७५४४०४५५ हा व्हॉटस् अँप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त वीजवितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याचा फोटो व संपूर्ण पत्ता किंवा लोकेशनसह माहिती / तक्रारी स्वीकारण्यात येत आहेत.
या क्रमांकावर नागरिकांना कॉल करण्याऐवजी फक्त व्हॉटस् अँपद्वारे माहिती द्यावी. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉटस् अॅप नाहीत त्यांनी एसएमएस’द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्यांचेही निराकरण करण्यात येणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज