
बाळासाहेब झिंजुरटे । वेडाच्या भरात गोचीड मारण्याचे औषध पिल्याने उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दि.२९ ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास सांगोला येथे घडली आहे. संतोष सिताराम इमडे रा.सावे ता.सांगोला असे मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे. Youth dies after taking gochid in Sangola
संतोष इमडे हा युवक गेल्या पंधरा वर्षापासून मानसिक आजाराने त्रस्त होता संतोष इमडे याने २७ ऑगस्ट रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास वेडाच्या भरात गोचीड मारण्याचे विषारी औषध प्राशन केले होते. त्याला अत्यवस्थ अवस्थेत सांगोला शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्याचा काल शनिवार २९ ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत धनंजय इमडे यांनी खबर दिली आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज












