टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूरात २१ डिसेंबर रोजी बसवेश्वर कृषी सेवा केंद्र कुंभारवेस ( सोलापूर ) येथे जिल्हास्तरीय पथकाने तपासणी केली.
या दुकानातून युरियाची विक्री प्रति गोनी ३५० रुपये प्रमाणे होत असल्याचे निदर्शनास आले. तोतया ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली.
तसेच याची शहानिशा करुन विक्री केंद्रावर कारवाई करण्यात आली. या कार्यवाहीमध्ये जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी . आर . शिंदे , कृषी उपसंचालक आर . टी . मोरे , कृषी विकास जि.प. सोलापूर व्ही . आर . कुंभार ,
उपविभागीय कृषी अधिकारी सोलापूर जे . जी . कवडे व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक एस . एन . बारवकर यांनी संयुक्त तपासणी केली .
शेतकऱ्यांनी सुध्दा युरियाची खरेदी ३५० रुपये न घेता २६६ एमआरपी प्रमाणे घ्यावी. इतर दुकानदार युरिया जादा दराने विक्री करत असल्यास
कृषी विभागास कळवावे म्हणजे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल , असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे .
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज