mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा-पंढरपूरच्या विजयानंतर आता यांच्यावर असणार गोव्याची जबाबदारी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 14, 2021
in मंगळवेढा, राजकारण, राज्य
राष्ट्रवादीचा पराभव करणाऱ्या समाधान आवताडेंचा भाजप कार्यकारिणीत सत्कार; जनतेला महाविकासआघाडी मान्य नाही

टीम मंगळवेढा टाईम्स ।

गोवा येथे येत्या फेब्रुवारीत विधानसभेची निवडणूक होणार आहे.ती जाहीर होण्यास अद्याप वेळ आहे.

मात्र भाजपने अगोदरपासून या निवडणुकीची तयारी केली आहे. त्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रभारी यापूर्वीच नेमणूक करण्यात आली आहे.

त्यांच्या मदतीला त्यांच्या टीममध्ये आता माजी मंत्री व मावळचे माजी आमदार बाळा भेगडे यांना घेण्यात आले. त्यांनी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील आपल्या अनुभवाचा वापर करुन गोव्यातही विजय मिळवू, असा विश्वास व्यक्त केला.

मंगळवेढा पोटनिवडणुकीत भेगडे पक्षाचे प्रभारी होते. या निवडणुकीसाठी ते तिकडे तळ ठोकून राहिले होते. त्यांच्या प्रचार नियोजनातून पक्षाचा तेथे विजय झाला.

म्हणून आता दुसरी तशीच जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. गोव्याच्या टीम फडणवीसमध्ये पक्षाने त्यांचा समावेश केला आहे.

राज्याचे माजी माजी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नारायण राणे या भाजपच्या फायर ब्रॅण्ड नेत्याचा सुद्धा या टीममध्ये समावेश होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील भाजपचे कोण कोण टीम फडणवीसमध्ये असणार हे येत्या दोन दिवसांत ठरणार आहे. दरम्यान, फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गोवा निवडणुकीबाबत राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची ‘व्हर्च्युल मिटिंग’ काल घेतली. त्याला भेगडेही हजर होते.

पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार आहे. पक्षाने ही मोठी जबाबदारी दिली असून तसेच, पक्षाला मोठे यश गोव्यात मिळवून देणार असल्याची नियुक्तीनंतरची पहिली प्रतिक्रिया भेगडे यांनी दिली.

फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तेथील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सदानंदशेठ यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील नेते आणि कार्यकर्ते प्रचारासाठी गोव्याला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

उमेदवार व पक्षाची बाजू गोव्यात प्रभावीपणे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. या महिन्याच्या अखेरीसच निवडणुपूर्व तयारीसाठी गोव्याला जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार आहे, असे ते म्हणाले.

भेगडेंसारख्या टीम फडणवीसमधील प्रत्येकाला गोव्यातील दोन-दोन, तीन-तीन मतदारसंघाची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

चाळीस सदस्यसंख्या असलेल्या गोवा विधानसभेत गतवेळी 2016 ला भाजपचे 13 आमदार निवडून आले होते. नंतर आणखी दहाजणांनी पक्षात प्रवेश केला.

तर, चार इतर व अपक्षांनी पाठिंबा दिला.त्यामुळे 27 आमदारांसह भाजप सध्या गोव्यात सत्तेत आहे. डॉ. सांवत त्यांचे तेथे मुख्यमंत्री आहेत. दरम्यान, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष `मगोप`ने त्यांची साथ आता सोडलेली आहे. त्यामुळेच ती कसर भरून काढण्यासाठी महाराष्ट्रातील रसद भाजपने गोव्याला पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.(स्रोत:सरकारनामा)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बाळा भेगडे

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 9, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 8, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

स्वप्नातील घरासाठी नागरिकांची तुफान पसंती; ‘दामाजी सिटी’ ठरतेय मंगळवेढ्यातील पहिली पसंती; भरघोस प्रतिसादानंतर अंतिम टप्प्यात बुकिंग; 9890605962 आजच संपर्क साधा

August 8, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

मंगळवेढ्यात कर्जमाफीचा मोठा धमाका! ‘त्या’ एकाच गावातील ३५६ शेतकऱ्यांना जॅकपॉट

August 5, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

शेतकऱ्याने पूर्ण कर्ज फेडले, तरीही बँकेने जमीन परस्पर विकली; पोलिसांनीही माणुसकी सोडली, जबरदस्तीने जमिनीचा ताबा

August 4, 2026
दारुडा भाऊसाहेब! गटविकास अधिकारी कार्यालयामध्ये ग्रामसेवकाचा दारू पिऊन धिंगाणा; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

मद्यप्रेमींसाठी मोठी बातमी! ओल्ड मॉन्क, आरसीसह ‘या’ दारू ब्रँड्सच्या विक्रीवर बंदी; FSSAI ने का उचललं हे पाऊल?

August 4, 2026
Next Post
पवार साहेब तुम्हीच न्याय मिळवून द्या! विठ्ठल कारखान्याच्या ऊस बिलासाठी शेतकऱ्याचा बेमुदत उपोषणाचा इशारा

पैसे उभारणार! विठ्ठल कारखान्यावरील जप्तीची कारवाई टाळण्यासाठी मंत्र्यांना साकडे; आज फैसला

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

शाळांच्या ‘इतक्या’ मीटर परिसरात जंक फूड दिसल्यास परवाना थेट रद्द; एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कठोर इशारा

August 9, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मराठे काय आहेत हे दाखवून देऊ! मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला थेट इशारा; राजकीय वर्तुळात खळबळ

August 9, 2026
खळबळ! सोलापूरात महिलेवर अत्याचारप्रकरणी एका पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल

माझा इतिहास भयानक, जेलमधून बाहेर आल्यावर सोडणार नाही; शासकीय कामादरम्यान बीएलओंसमोरच ताणली रिव्हॉल्व्हर; SIR नोंदणीवेळी थेट रिव्हॉल्व्हर रोखून धमकी

August 8, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

​ग्रामीण तरुणाईला गावातच रोजगाराची सुवर्णसंधी; ‘कृषि उद्योजक निवड अभियानाला प्रारंभ; ‘माणगंगा परिवार’ आणि ‘ई-ॲग्री दुकान’चा ग्रामीण युवकांसाठी मोठा पुढाकार

August 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 8, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..