राजेंद्र फुगारे । मंगळवेढा टाईम्स
रोजंदारीवर काम करणाऱ्या सचिन मांजरे याची राज्य राखीव दलामध्ये निवड झाल्याबद्दल शिक्षक आ.दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पंढरपूर तालुक्यातील कोंढरकी हे साधारण १४०० लोकसंख्या असलेलं गाव . गावातील बहुसंख्य नागरिक हे बांधकाम व्यवसायकडे वळलेले गावात शासकीय नोकरदारांची संख्या तशी नगण्यच.
अशातच गावातील सचिन बाळू मांजरे या तरुणाने राज्य राखीव बल क्रमांक १ ( एस.आर.पी.एफ. ) मध्ये भरती होऊन त्याच्या पिढीतील पहिला सरकारी नोकरदार बनण्याचा मान मिळवला आहे .
सचिन याची कौटुंबिक परिस्थिती अतिशय बेताची . दोन पत्र्यांच्या खोल्यांचे घर , आई – वडील शेतमजूर आणि स्वतः इतरांच्या शेतामध्ये कष्ट करून आपल्या ध्येयाशी ठाम तो ठाम होता.
सचिनने परिस्थितीशी दोन हात करत हे यश मिळवले आहे . पोरानं आई – वडिलांच्या कष्टाचं चीज केल्याबद्दल माजी आ.दत्तात्रय सावंत यांनी त्याचा सत्कार केला.
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे सचिनने मिळेल ते काम करून आपले शिक्षण पूर्ण केले.
सचिनच्या या सत्कारा प्रसंगी समाधान घाडगे सर, मारुती गायकवाड सर,प्रमोद देशमुख सर,राजेंद्र आसबे सर,शिंदे सर,राजेंद्र फुगारे, राम पाटील,बलभिम दांडगे,अजय घाडगे आदी उपस्थित होते.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज