टीम मंगळवेढा टाईम्स ।
मोडलेला मणका व गेलेली पायाची ताकद परत आणण्याची किमया गजानन लोकसेवा हॉस्पिटल येथील डॉ.प्रवीण सारडा यांनी केली आहे.
मंगळवेढा शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती असलेले विजय देशमाने हे घरात जोरात पडल्याने मणका मोडल्यामुळे पायाची ताकद पूर्णपणे गेली होती.
विजय देशमाने यांना डॉ.प्रवीण सारडा यांच्या गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
डॉ.प्रवीण सारडा यांनी तातडीने मणक्याचे क्रिटिकल ऑपरेशन केले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यावर डॉक्टर प्रवीण सारडा यांनी देशमाने कुटुंबीयांना रुग्ण बरे होण्याची खात्री दिली.
क्रिटिकल शस्त्रक्रियेनंतर 7 दिवसात रुग्ण बसू शकले व 21 दिवसात चालू शकले. तसेच ऑपरेशनच्या तीन महिन्यानंतर दामाजी साखर कारखान्यात सिव्हिल इंजिनिअर या पदावर पुन्हा कामावर ते कार्यरत झाले.
यामुळे देशमाने यांना जीवदान व कुटूंबियांना दिलासा मिळाल्यामुळे त्यांनी डॉ.प्रवीण सारडा यांचे आभार मानले.
मंगळवेढेकरांच्या हक्काचे गजानन लोकसेवा हॉस्पिटल नागरिकांसाठी 24 तास सुरू असून रुग्णसेवेसाठी डॉ.प्रवीण सारडा हे 24 तास उपलब्ध असतात.
मणक्याच्या व हाडांच्या संपूर्ण शस्त्रक्रिया येथे होत असल्यामुळे नागरिकांची वेळेची व पैशाची बचत झाली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज