mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

चोरीच्या पैशातून करायचा सावकारी, सोलापूरच्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या: 77 लाखांचा मुद्देमाल जप्त

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 1, 2021
in सोलापूर, आरोग्य, राज्य
संतापजनक! मंगळवेढ्यात जन्मदात्या आईनेच केला मुलीचा खून

टीम मंगळवेढा टाईम्स ।

एक अट्टल चोरटा जे घर बंद आहे, त्याची दिवसभर पाहणी करायचा. त्यानंतर रात्री घरफोडी करायचा. घरफोड्या करून त्याने लाखो रुपयांची माया जमवली आणि त्या चोरीच्या पैशांतून त्याने चक्क सावकारी सुरू केली.

या अट्टल चोरट्याचा माग काढून चिंचवड पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 77 लाख 47 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

लखन अशोक जेटीथोर (वय 32, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड. मूळ रा. सोलापूर) असे अटक केलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे. त्याच्यासह रवी शिवाजी भोसले (वय 42, रा. रहाटणी. मूळ रा. सोलापूर), सुरेश नारायण जाधव (वय 42, रा. रहाटणी. मूळ रा. सातारा) यांना देखील अटक केली आहे.

त्यांचा चौथा साथीदार कृष्णा जाधव सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लखन चायनीजची गाडी लावून त्यावर आपली उपजीविका चालवत असल्याचे दाखवत होता.

दिवसा बंद घरांची रेकी करून रात्रीच्या वेळी देखील ती घरे बंद असल्याची खात्री करत असे. त्यानंतर त्याच्या सोयीने घरफोडी करण्यासाठी लागणारी हत्यारे लखन आजूबाजूच्या परिसरात अडगळीच्या ठिकाणी टाकत असे. मध्यरात्री दोन वाजल्यानंतर येऊन तो रेकी केलेले घर फोडत असे.

वाल्हेकरवाडी परिसरात घरफोडीच्या वारंवार घटना घडल्याने चिंचवड पोलिसांनी वाल्हेकरवाडी परिसरात लक्ष केंद्रीत केले. एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्यात एक संशयित व्यक्ती मास्क लावून जात असताना दिसले.

मात्र, एका विशिष्ट ठिकाणी गेल्यावर संशयित व्यक्ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आढळत नसे. त्यामुळे पोलिसांनी संशयित आरोपीची माहिती काढून ओळख पटवली.

लखन याच्यावर सन 2009 ते 2012 या कालावधीत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सदर बाजार आणि फौजदारचावडी पोलीस ठाण्यात नऊ गुन्हे दाखल असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने चिंचवड, भोसरी आणि चिखली परिसरात घरफोड्या केल्याचे कबूल केले.

लखन हा त्याचे साथीदार आरोपी रवी आणि सुरेश यांच्या मदतीने घरफोडी केलेला माल विकत असे. पोलिसांनी त्याच्या दोन साथीदारांना देखील अटक केली. वाल्हेकरवाडी परिसरात घरफोडी केल्यावर लखन त्याचा मित्र कृष्णा जाधव याच्या घरी जाऊन झोपत असे. कृष्णा जाधव सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

लॉकडाऊनच्या कालावधीत लखनचा चोरीचा माल विकला गेला नाही. चोरीच्या पैशातून तो सावकारी करत असे. त्यातूनच त्याने एकाकडून फॉर्च्युनर कार जबरदस्तीने आणली होती. चोरी करून पैसे साठवून त्याला फ्लॅट घ्यायचा होता.

या कारवाईमुळे चिंचवड चोरी केलेले 78 तोळे सोने, 10 टीव्ही, गुन्ह्यासाठी वापरलेली फॉर्च्युनर असा एकूण 77 लाख 47 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपपोलीस आयुक्त मंचक इप्पर, सहाय्यक आयुक्त सागर कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर काटे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू ठुबल, उपनिरीक्षक नामदेव तलवाडे,

सहाय्यक पोलीस फौजदार पांडुरंग जगताप, पोलीस अंमलदार स्वप्निल शेलार, वृषिकेत पाटील, अवताडे, राजू जाधव, विजयकुमार आखाडे, नितीन राठोड, पंकज भदाणे, अमोल माने, गोविंद डोके, सदानंद रुद्राक्षे यांनी केली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: चोरी

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढ्यातील १ लाख ९९ हजार मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! २००२ च्या यादीत नाव नसेल तर ‘या’ कागदपत्रांशिवाय पर्याय नाही

July 7, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

गुन्हेगारांनो सावधान! सुधारा, नाहीतर थेट कारवाई..; पोलिसांची सिंघम स्टाईल ॲक्शन; पोलीस अधीक्षकांनी गुंडांना बोलावून भर चौकात दिला सज्जड दम; लिहून घेतले हमीपत्र

July 7, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूर जिल्ह्याची चिंता मिटली! हवामान खात्याच्या ‘या’ अंदाजाने उजनी धरणाच्या पाणीपातळीत होणार मोठा चमत्कार?

July 7, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मंगळवेढ्याला हादरवणारी बातमी! एका सुखी संसाराचा असा का झाला शेवट? २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासू-दिराविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

सावधान! बीएलओ तीनदा येऊनही भेटला नाही तर मतदार यादीतून नाव होणार बाद; ​निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 7, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

पालकांनो नोंद घ्या! ऐन शाळा सुरू होताच शिक्षकांचा ‘एल्गार’; ७ आणि ८ जुलैला शाळा बंद राहण्याची शक्यता; काय आहे कारण?

July 6, 2026
आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

आमदार रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढ्यात सामाजिक उपक्रमांचा धडाका; ​उद्योजक राहुल ताड यांच्या संकल्पनेतून अनोखा उपक्रम

July 5, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 5, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांनो! ट्रॅक्टर-बैलगाडी आता कोणीच अडवणार नाही; शेतीकामांसाठी मुरूम, वाळू, दगड मोफत

July 3, 2026
Next Post

शिक्षकदिनी होणार आदर्श शिक्षकांचा गौरव; 'स्वाभिमानी शहर'चे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढ्यातील १ लाख ९९ हजार मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! २००२ च्या यादीत नाव नसेल तर ‘या’ कागदपत्रांशिवाय पर्याय नाही

July 7, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

गुन्हेगारांनो सावधान! सुधारा, नाहीतर थेट कारवाई..; पोलिसांची सिंघम स्टाईल ॲक्शन; पोलीस अधीक्षकांनी गुंडांना बोलावून भर चौकात दिला सज्जड दम; लिहून घेतले हमीपत्र

July 7, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूर जिल्ह्याची चिंता मिटली! हवामान खात्याच्या ‘या’ अंदाजाने उजनी धरणाच्या पाणीपातळीत होणार मोठा चमत्कार?

July 7, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मंगळवेढ्याला हादरवणारी बातमी! एका सुखी संसाराचा असा का झाला शेवट? २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासू-दिराविरुद्ध गुन्हा

July 7, 2026
​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

​पोलीस ठाण्याच्या मैदानात रंगला थरार; मंगळवेढा व्हॉलीबॉल स्पर्धेत ‘हे’ संघ ठरले मानकरी; पोलीस-जनता सलोख्यासाठी रंगले सामने

July 6, 2026
सर्वात मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीच्या तारखा ‘या’ दिवशी जाहीर होणार?; निवडणूक आयोगाच्या हालचाली सुरु

सावधान! बीएलओ तीनदा येऊनही भेटला नाही तर मतदार यादीतून नाव होणार बाद; ​निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

July 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..