टीम मंगळवेढा टाईम्स ।
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या 5 जून 2021 रोजीचा आदेशानुसार शासनाने निश्चित केलेल्या 5 स्तरांपैकी सोलापूर जिल्हा हा तिसऱ्या स्तरात मोडत असल्याने मंगळवेढा शहर, संत दामाजीनगर ग्रामपंचायत व संत चोखामेळानगर ग्रामपंचायत आज सोमवार दि.7 जूनपासून पुढील आदेश होईपर्यंत खालील प्रमाणे विविध आस्थापना सुरू राहतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
अत्यावश्यक सेवा / वस्तूशी संबंधित असणारी दुकाने/आस्थापना सर्व दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.
भाजीपाला व फळे सर्व दिवशी ( सोमवारचा आठवडा बाजार भरणार नाही) दुपारी 4.00 वाजेपर्यंत आठवडा बाजार या ठिकाणी मंडई सुरक्षित अंतर ठेऊन भरेल.
बिगर अत्यावश्यक सेवा / वस्तूकशी संबंधित असणारी दुकाने/आस्थापना सोमवार ते शुक्रवार दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. म्हणजेच अत्यावश्यक सेवा सोडून इतर सर्व दुकाने शनिवारी व रविवारी पूर्णतः बंद राहतील
हॉटेल/रेस्टॉवरंट हे त्यांच्या एकुण क्षमतेच्या 50% क्षमतेने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. त्या नंतर केवळ पार्सल सेवा/घरपोच सेवा चालू राहतील.
सुट दिलेली कार्यालये वगळून इतर खाजगी कार्यालये कामाच्या दिवशी दुपारी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील.
जीम/सलून/ब्युटी पार्लर , केंद्र / स्पा/ वेलनेस सेंटर एअर कंडीशन न वापरता अपॉईंटमेंट घेउनच *दुपारी 4.00 वाजेपर्यंत एकुण क्षमतेच्या 50% क्षमतेने* चालू राहतील.
विवाह सोहळ्यासाठी एकुण 50 व्य्क्तींच्या मर्यादेत परवानगी राहील. अंत्य विधींसाठी 20 व्य्क्तींची परवानगी राहील.
सार्वजनिक ठिकाणे / उघडी मैदाने / चालणे / सायकलींग हे दररोज सकाळी 5.00 पासून सकाळी 9.00 वा. पर्यंत चालु राहतील. खेळ फक्त ऑटडोअर साठी दररोज सकाळी 5.00 पासून सकाळी 9.00 वा. पर्यंत चालु राहतील.
त्यामुळे कोरोना नियमाचे काटेकोर पालन करावे. विनाकारण गर्दी करू नये. आजपासून सर्वच दुकाने उघडत असल्याने एकाच दिवशी गर्दी करू नये. असे आवाहनही कर निरीक्षक विनायक साळुंखे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज