mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

गाव कोरोनामुक्त करताना पाटील हरले! मंगळवेढ्यातील पोलीस पाटलांचा आईसह बळी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 31, 2021
in मंगळवेढा, सोलापूर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पहिल्या लाटेपासूनच फ्रंटलाइनमधील कर्मचाऱ्यांसह ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या गावांना कोरोनापासून लांब ठेवण्याचे कार्य पोलिस पाटलांमार्फत होत आहे.

यात अनेक पोलिस पाटलांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यूही झाला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मंगळवेढा तालुक्‍यातील जालिहाळ गावाला कोरोनापासून मुक्त ठेवलेले पोलिस पाटील हणमंत कांबळे दुसऱ्या लाटेत मात्र कोरोनाशी लढताना हरले.

14 दिवसांपूर्वीच त्यांच्या आईचे देखील कोरोनाने निधन झाले. रविवारी पहाटे पोलिस पाटील हणमंत पाटील यांचा कोरोनाने बळी घेतला.

कोरोनाचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात वाढल्यामुळे गावपातळीवर ग्रामस्तरीय समितीमधील तलाठी, ग्रामसेवक यांच्यावर अतिरिक्त गावांचा पदभार आल्यामुळे गावगाड्यातील सर्वस्वी जबाबदारी पोलिस पाटलांवर आली.

मंगळवेढा येथून पंधरा किलोमीटर अंतरावर जवळपास दोन हजार लोकवस्तीच्या जालिहाळमध्ये अशिक्षित लोकांची संख्या जास्त असल्यामुळे कोरोनाच्या पहिल्या लाटेत लोकांना घराबाहेर फिरू नका, मास्क वापरा, गर्दी करू नका, असे सांगताना लोकांना विश्वास बसायचा नाही.

पोलिस पाटील काहीतरी सांगतोय, असा समज गावकऱ्यांना व्हायचा. अशा परिस्थितीत गावकऱ्यांसाठी प्रसंगी पोलिसांना पाचारण करून गाव कोरोनापासून मुक्त ठेवण्याचा प्रयत्न पोलिस पाटील हणमंत पाटील यांनी केला.

मात्र, मार्च महिन्यापासून सुरू झालेल्या दुसऱ्या लाटेतच पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक झाली. याची नजर गावाला लागली. या दरम्यान गावामध्ये 30 च्या आसपास पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.

यात 9 जणांचा मुत्यू झाला. याच लाटेत पोलिस पाटील हणमंत कांबळे यांची आई मालन कांबळे यांचा गेल्या चौदा दिवसांपूर्वी मंगळवेढा येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

कुटुंबामध्ये स्वतः पोलिस पाटील व त्यांचा लहान मुलगा रॅपिड अँटिजेन चाचणीमध्ये पॉझिटिव्ह आढळले. त्यांची अंगणवाडी सेविका असून, त्या कोरोना निगेटिव्ह आल्या. पोलिस पाटलाने उपचारासाठी सांगली जिल्ह्यात आश्रय घेतला.

मात्र, उपचार सुरू असताना रविवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. पत्नी अंगणवाडी सेविका व लहान मुलगा हे दोघे आता पोरके झाले आहेत. त्यामुळे गाव कोरोनापासून मुक्त ठेवण्यासाठी पहिल्या लाटेत जीव धोक्‍यात घालून धडपडणाऱ्या पोलिस पाटलाचा दुसऱ्या लाटेत मात्र स्वतःचा जीव गमवावा लागल्याने गाव हळहळले.(स्रोत:सकाळ)

तोकड्या मानधनाच्या जीवावर गावाला कोरोनामुक्त ठेवले

कोरोनाच्या लाटेत आपल्या व आपल्या कुटुंबाचा जीव सुरक्षित राहावा म्हणून अनेक शासकीय कर्मचारी काम आहेत. मात्र तोकड्या मानधनाच्या जीवावर गावाला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी जीव धोक्‍यात घालणारे पोलीस पाटील व ग्रामरक्षक दलासह सध्या गावातील मोजके तरुण पुढाकार घेत आहेत.

ग्रामीण भागातील अत्यावश्‍यक सेवेतील दूध, किराणा, पिठाची गिरणी व्यावसायिकांना लसीकरणामध्ये प्राधान्य द्यावे. शासनाने कोरोना काळात मृत्यू झालेल्या पोलिस पाटलांच्या वारसांना 50 लाखांचा मदतनिधी द्यावा. – सचिन चौगुले, सरपंच, जालिहाळ, सिद्धनकेरी

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: कोरोना मंगळवेढापोलीस पाटील

संबंधित बातम्या

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

April 14, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 14, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 14, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संतापजनक! घरजागा नावावर करण्यास नकार; पोटच्या मुलानेच वृद्ध आईला घराबाहेर हाकलले; न्यायासाठी वृद्धेची पोलिस अधीक्षकांकडे धाव

April 12, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

Breaking! मंगळवेढ्यात शासकीय नियमांची ऐशीतैशी; दालनात वाढदिवस साजरा करणे पडणार महागात; गटविकास अधिकारी यांचा अहवाल सादर करण्याचे पुण्यातून फर्मान

April 12, 2026
Next Post
समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पंढरपूर- मंगळवेढ्यातील रस्त्यांच्या कामांसाठी मंजुरी : आ.समाधान आवताडे

ताज्या बातम्या

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

April 14, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 14, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात हुंड्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती, सासू, दीर, सासर्‍यांविरोधात गुन्हा दाखल

आम्हाला मुलगाच हवा होता! पोटच्या लेकीला आणि सुनेस ठरवले ‘पांढऱ्या पायाची’; उपाशी ठेवून काढले घराबाहेर; मंगळवेढ्यात सासरच्यांचा अमानुष छळ; पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

April 14, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

भगीरथदादा आता प्रवास पुरे! ‘पक्षांतराचा प्रवास आता थांबवा’; सिद्धाराम म्हेत्रेंचा भगीरथ भालकेंना रोखठोक सल्ला

April 13, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

काळीज पिळवटून टाकणारी घटना! शेततळ्यात बुडून बहीण-भावाचा अंत; आजीसमोरच काळाचा घाला; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

April 14, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

मंगळवेढेकरांची प्रतीक्षा आता संपणार ! महात्मा बसवेश्वर स्मारकाची जागा निश्चित; निधी कमी पडू देणार नाही; आमदार समाधान आवताडेंची ग्वाही

April 13, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..