mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापुरातील रुग्णांची दिशाभूल! आर्युर्वेदाची डिग्री असताना अँलोपॅथीचे उपचार; खासगी हॉस्पिटलवर गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 20, 2021
in सोलापूर, राज्य
मेडिकल विद्यार्थ्यांची NEET-PG परीक्षा पुढे ढकलली; इंटर्नशीप डॉक्टरांनाही आता करोनारुग्णांची सेवा बजावण्याची परवानगी

टीम मंगळवेढा टाईम्स ।

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासनाने काही नियम आखून दिले आहेत. मात्र सोलापुरात या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉस्पिटलविरोधात पालिका प्रशासनाच्यावतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर शहरातील रंगभवन परिसरात असणाऱ्या विनीत हॉस्पिटलविरोधात पालिकेच्यावतीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनीत हॉस्पिटलचे संचालक डॉ. विद्याधर पंढरीनाथ सुर्य़वंशी यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद कऱण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे या रुग्णालयासंदर्भात तक्रार प्राप्त झाली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आतिश बोरोडे, उपायुक्त धनराज पांडे, डॉ. बिरुदेव दुधभाते, लेखापरीक्षक डॉ. वैभव राऊत आदींनी जाऊन पाहणी केली.

यावेळी रुग्णालयातील अनेक गंभीर प्रकार समोर आले आहेत. हॉस्पिटलमध्ये संचालक असलेले डॉ. विद्याधर सुर्यंवशी यांचे वैद्यकीय शिक्षण हे आर्युवेद विषयातील आहे. मात्र रुग्णालयाबाहेर असलेल्या बोर्डवर सूर्यवंशी यांनी आपण एम.डी. फिजिशिअन असून हृदयरोग, मधूमेह, फूप्फूस विकार आणि आयसीयू तज्ञ असल्याचे नमूद केले आहे.

त्यामुळे आर्युर्वेदाची डिग्री असताना अॅलोपॅथीची ड्रिग्री लिहून रुग्णांची दिशाभूल केल्याचा आरोप डॉ. सूर्यवंशी यांच्या विरोधात करण्यात आला आहे.

तसेच रुग्णालयांकडे महाराष्ट्र नर्सिग अॅक्टचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. मात्र सदरील रुग्णालयकडे हे प्रमाणपत्र नव्हते. तसेच कोरोनाच्या काळात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी महानगरपालिकेची परवानगी घेणे देखील आवश्यक आहे.

मात्र या रुग्णालयाने महानगरपालिकेकडून देखील कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. त्यामुळे कोविड बाधित रुग्णांवर अवैध पद्धतीने उपचार करत असल्याचा ठपका ठेवत पालिकेच्यावतीने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान हॉस्पिटलचे नोंदणी प्रमाणपत्र, डॉक्टरांचे डिग्री आणि रजिस्टेशन सर्टिफिकेट हे दर्शनी भागात लावणे गरजेचे आहे. कोविडच्या बाबतीत उपचार करताना शासनाने वेगवेगळ्या सूचना दिल्या आहे.

मात्र यापैकी कोणत्याही नियमाचे पालन रुग्णालयतर्फे करण्यात आले नसल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल कऱत असल्याचे फिर्य़ादित नमूद करण्यात आले आहे. तर “संबधित रुग्णालयाने नियम मोडल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट करुन रुग्णालय सील करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉक्टरसोलापूर

संबंधित बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 22, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026
Next Post
दुर्दैवी घटना! चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळून, सहा जणांचा मृत्यू, घटनास्थळी आक्रोश

नौदल सेनेला सलाम! तौक्ते वादळाच्या तडाख्यात अडकलेल्या मंगळवेढ्याच्या विश्वजीत बंडगरनी सांगितला थरारक अनुभव

ताज्या बातम्या

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

घरात तहान, पाणी कर्नाटकच्या दारात! उजनी कालवाच्या गळतीमुळे मंगळवेढ्यातील शेतकरी संकटात; पाटबंधारे विभागाविरोधात संताप

September 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा