mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शैला गोडसे, सचिन पाटील यांच्यामुळे आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर असणार ‘ही’ मोठी अडचण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 31, 2021
in सोलापूर
शैला गोडसे, सचिन पाटील यांच्यामुळे आघाडीत बिघाडी, राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर असणार ‘ही’ मोठी अडचण

सिध्देश्वर आवताडे यांच्या उमेदवारी अर्जामुळेनिवडणुकीत येणार रंगत!

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत असताना दोन्ही पक्षाच्या उमेदवारांसमोर एक मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

कारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आपला उमेदवार देऊन राष्ट्रवादीसमोर आव्हान उभं केलंय. तर दुसरीकडे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या चुलत भावानेही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

पंढरपूरच्या रिंगणात भाजपनं समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना मैदानात उतरवलं आहे. तर अन्य उमेदवार मिळून तब्बल 38 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

अशा स्थितीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांना बंडाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या उमेदवारीला घरातूनच विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय.

समाधान आवताडे यांचे चुलत भाऊ सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.पंढरपूरच्या भाजप पुरस्कृत नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनीही भाजप विरोधात दंड थोपटले आहेत.

भोसले यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. या दोन उमेदवारांमुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे नेते हे पक्षांतर्गत बंड कसं थंड करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेच्या नेत्या शैला गोडसे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे त्यांची उमेदवारी ही जनतेतून असून ही निवडणूक लढवणारच अशी ठाम भूमिका शैला गोडसे यांनी घेतल्यामुळे राष्ट्रवादी समोर कडवे आव्हान उभे असणार आहे.

तसेच पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालकेंच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालं. स्वाभिमानीचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांच्या उमेदवारी अर्जासोबत स्वाभिमानी पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने याद्वारे महाविकास आघाडीच्या विरोधात रणशिंग फुंकलं असल्याचं बोललं जात आहे.

माजी खासदार राजू शेट्टी स्वाभिमानीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी पंढरपुरात तळ ठोकून राहणार आहेत. ते गावोगावी जाऊन प्रचार सभाही घेणार आहेत अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उमेदवारी अर्जपोटनिवडणुकमंगळवेढा पंढरपूर मतदारसंघ

संबंधित बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

डोळ्यांदेखत स्वप्ने जळतायत! पाऊस नसल्याने उभी पिके करपली; मंगळवेढ्यासह संपूर्ण जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई; ‘सोलापूर जिल्हा दुष्काळी जाहीर करा’, शेतकऱ्यांची आर्त हाक

July 15, 2026
सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

बहिणीची दादागिरी! सोन्याच्या दुकानात पूर्ण भागीदारीसाठी भावाला धमकी; ज्वेलर्ससमोर गोंधळ घालणाऱ्या बहिणीवर गुन्हा

July 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

खुनाचा प्रयत्न प्रकरणातून आरोपीची मुक्तता; मंगळवेढ्यात ॲड.ओंकार भुसे यांच्या न्यायालयीन कौशल्याची चर्चा

July 14, 2026

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
Next Post
शिवसेना महिला आघाडीच्या शैला गोडसे यांच्या मंगळवेढ्यातील संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन

शिवसेनेचे काम तळागाळापर्यंत पोहचवणाऱ्या शैला गोडसेंना शिवसेनेतून काढून टाकले; महिला वर्गातून गोडसे यांना चांगले समर्थन

ताज्या बातम्या

अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! पंढरपुरात आषाढी वारीच्या तोंडावर खळबळ; ‘या’ प्रसिद्ध मिसळ सेंटरसह हॉटेल्सवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; तक्रारींसाठी नागरिकांनी ‘या’ क्रमांकावर संपर्क साधावा

July 17, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांसाठी देवमाणूस ठरले आ.समाधान आवताडे! उजनी आणि म्हैसाळमधून थेट शेतात पोहोचणार पाणी

July 17, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला! मतदार यादीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर; ‘या’ तारखेला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी

July 17, 2026
मोठी बातमी! वर्षाला ‘इतके’ गॅस सिलिंडर मोफत देणार; युती सरकार आणा, पुढील 5 वर्षे वीज मोफत.; भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा

अजित पवारांच्या जयंतीचा समावेश राष्ट्रपुरुष आणि थोर पुरुषांच्या यादीत, दादांची जयंती शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयात साजरी होणार; ‘या’ तारखेला राज्यभर पहिली शासकीय जयंती

July 16, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! मॉलमध्ये काम करणाऱ्या २१ वर्षीय तरुणाचा भीमा नदीच्या पुलावरून पडून मृत्यू; घातपाताचा संशय?

July 16, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा