mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शैला गोडसेंवर कार्यकर्त्यांचा दबाव वाढला; कोणत्याही परिस्थितीत पोटनिवडणूक लढवण्याची मागणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 23, 2021
in मंगळवेढा
शिवसेना महिला आघाडीच्या शैला गोडसे यांच्या मंगळवेढ्यातील संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्याच्या विविध प्रश्नांवर अनेक आंदोलने करून दुष्काळग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी मनापासून प्रयत्न करणाऱ्या शैलाताई गोडसे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवावी असे मत मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील व नंदेश्‍वर गावातील महिला नेत्या रेखा कसबे यांनी व्यक्त केले आहे.

रेखा कसबे पुढे म्हणाल्या की, शैलाताई गोडसे या एक महिला असूनही पुरुषांना लाजवेल असा त्यांचा बाणा त्यांच्या देहबोलीतून दिसतो आहे. आजपर्यंत मंगळवेढा तालुक्यातील जनतेने ज्या नेत्यांना भरभरून मतदान केले. अशा कोणत्याही नेत्याने दुष्काळी भागाच्या पाणी प्रश्नावर व तसेच इतर भागातील अनेक प्रश्नांवर कधीही आवाज उठविला नाही.

पण शैलाताई गोडसे यांना मंगळवेढा तालुक्यातील जनतेने काहीही दिलेले नसताना त्यांनी मंगळवेढा तालुक्याच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून वेळोवेळी सर्व प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

यामध्ये शिरनांदगी तलावात म्हैसाळचे पाणी सोडण्यासाठी केलेले आंदोलन, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील आठ गावांचा म्हैसाळ योजनेतील नव्याने समावेश करण्यासाठी उभारलेला लढा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी नंदेश्वर येथे केलेले लाक्षणिक आंदोलन,

तसेच तालुक्याच्या पूर्व भागाला कॅनॉलचे पाणी मिळवण्यासाठी केलेला पाठपुरावा अशा अनेक प्रश्नांवर शैलाताई गोडसे यांनी मोठा आवाज उठविला आहे.

यामध्ये शिरनांदगी तलावात म्हैसाळ योजनेच्या इतिहासात पहिल्यांदाच पाणी पोहोचले तसेच म्हैसाळ योजनेत मंगळवेढा तालुक्याच्या आठ गावांचा नव्याने समावेश होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अशाप्रकारे त्यांनी दोन महत्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून दिला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील जनतेने शैलाताई गोडसे यांना काहीही न देता शैलाताई यांनी मोठे योगदान मंगळवेढा तालुक्यासाठी दिले आहे. याची तमाम जनतेला जाण आहे. प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्यामुळे त्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत.

त्यामुळे आगामी पोटनिवडनूक शैलाताई गोडसे यांनी कोणत्याही परिस्थितीत लढवावी. मंगळवेढा तालुक्यातील जनता शैलाताई गोडसे यांना भरभरून मतदान करतील, असेही यावेळी बोलताना रेखा कसबे म्हणाल्या.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोटनिवडणुकलढवावीशैला गोडसे

संबंधित बातम्या

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

August 11, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

August 11, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढा पोलिसांना संभाजी ब्रिगेडचे थेट आव्हान; अवैध धंदे रोखा, नाहीतर १५ ऑगस्टला आमरण उपोषण

August 11, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

मंगळवेढ्यात तुमची जमीन, प्लॉट किंवा घर विकायचंय? मिळवा सर्वोत्तम किंमत आणि १००% सुरक्षित व्यवहार; पारदर्शकता आणि विश्वासाचे एकमेव नाव ७/१२ डेव्हलपर्स; 9970766262 व 9890605962 आजच संपर्क साधा

August 9, 2026
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

चालू हॉटेल मागून येऊन पेटवले, एक लाखाचे नुकसान; अज्ञात विकृतावर मंगळवेढ्यात गुन्हा दाखल; मंगळवेढ्यात नेमकं काय घडलं

August 8, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

मोठी खळबळ! मंगळवेढ्यात २६ वर्षीय विवाहित महिलेचे टोकाचे पाऊल; स्वयंपाक खोलीत ओढणीने घेतला गळफास; आत्महत्येचे कारण…

August 8, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

मंगळवेढ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या ७१ वर्षीय महिलेचे सोन्याचे गंठण लांबवले; महिनाभरात दुसरी घटना, महिलांमध्ये घबराट

August 7, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

​मंगळवेढा हादरला! मुदतबाह्य दही, ताक आणि लस्सी बाजारात; ‘या’ दूध डेअरीवर एफडीएचा सर्जिकल स्ट्राईक; ​तुकाराम मुंढेचा दणका

August 7, 2026
Next Post
शेतकऱ्यांन समोर पुढचे काही तास अवकाळी पावसाच संकट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट

शेतकऱ्यांन समोर पुढचे काही तास अवकाळी पावसाच संकट! 'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट

ताज्या बातम्या

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

सामाजिक भान! सिद्धनाथ सलगर यांच्या वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना खाऊ वाटप; आज विविध शाळांमध्ये उपक्रमाचे आयोजन

August 12, 2026
मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

मुस्लिम जमियत मंगळवेढयाच्या ‘चेज रिपोर्ट’ प्रस्तावाला वक्फ मंडळाची मंजुरी; नवनिर्वाचित कार्यकारिणी जाहीर; इम्रान काझी उपाध्यक्ष

August 11, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

​दारू प्याल तर १० हजारांचा भुर्दंड; ग्रामसभेत ग्रामस्थांचा एकमताने ऐतिहासिक ठराव; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ गावाचा धाडसी निर्णय; गावात दारूबंदीसाठी कडक नियमावली लागू

August 11, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

August 11, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

मंगळवेढा पोलिसांना संभाजी ब्रिगेडचे थेट आव्हान; अवैध धंदे रोखा, नाहीतर १५ ऑगस्टला आमरण उपोषण

August 11, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आंबोलीच्या धबधब्याखाली आनंद लुटत होते, अचानक गडागडा लोळायला लागले; तोंडातून फेस, पर्यटकाचा मृत्यू

August 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..