टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी बठाण येथील भारत बेदरे यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दिले. बेदरे यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष , जिल्हा उपाध्यक्ष , रोजगार हमी योजना समितीचे तालुकाध्यक्ष म्हणून काम केले आहे.
सुरुवातीपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय सदस्य असून बठाण ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही काम पाहिले आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुखे-पाटील, राजेंद्र हजारे, लतीफ तांबोळी आदींनी अभिनंदन केले.
निवडीनंतर त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून तळागाळातल्या नागरिकांसाठी विकास योजना राबवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज